धुळे दर्पण न्यूज :-
 स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्याच्या उद्दिष्टाने मंगळवारी महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी 'एक खिडकी योजना' सुरू करण्यात आली. या योजनेचा प्रारंभ महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीत आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते झाला.

   या योजनेचा उद्देश स्वच्छता कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आहे. यामध्ये महात्मा फुले महामंडळ, पंतप्रधान आवास योजना, वैयक्तिक शौचालय, पंतप्रधान सहज बिजली हर घर योजना, पीएम जन धन योजना, उज्ज्वला गॅस योजना, पंतप्रधान जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, मिशन इंद्रधनुष्य, पीएम सुरक्षा विमा योजना आणि पीएम जीवन ज्योती विमा योजना यांचा समावेश आहे.

   स्वच्छता निरीक्षक विकास साळवे यांनी वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली, तर नीलकंठ फुलदेवरे यांनी बँकांच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देखील दिली गेली. कार्यक्रमाला सहायक आयुक्त प्रांजली मुंडे, नगर सचिव मनोज वाघ, कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -