धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर डांबर घोटाळ्याचा पर्दाफाश करताना महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार व माजी आमदार अनिल गोटे यांनी हिंदू धर्मयोध्दाच्या काळ्या धंद्यांचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, महापालिकेतील डांबर प्रकल्पांमध्ये केवळ दोन वर्षांत ६४७ कोटींचा घोटाळा झाला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
डांबर कंपन्यांच्या संशयास्पद हालचाली
अनिल गोटेंनी पत्रकार परिषदेत सांगितले की, धुळे महापालिका १ जानेवारी २०१९ रोजी अस्तित्वात आली आणि डांबर पुरवणाऱ्या कंपन्या २०२१ व २०२२ मध्ये स्थापन झाल्या. पहिल्या दोन वर्षांतच ६४७ कोटींची कामे करण्यात आली असून तिसऱ्या वर्षाचा हिशोब अद्याप येणे बाकी आहे. विशेष म्हणजे, या कंपन्यांचे संबंध मुस्लिम देशांमधील डुप्लिकेट डांबर पुरवठादारांशी असल्याचा आरोप त्यांनी केला.
कंपन्यांचे राजीनामे आणि संशयास्पद व्यवहार
महापालिकेत घोटाळ्याचा पर्दाफाश करताना गोटेंनी नमूद केले की, धर्मयोध्द्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी १३ दिवस आधी दोन कंपन्यांच्या संचालक पदांचा राजीनामा दिला. यामागे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करून संपत्तीचा तपशील लपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
डांबराचा निकृष्ट दर्जा आणि अपयशी प्रकल्प
गोटे यांनी सांगितले की, शहरातील रस्त्यांसाठी वापरण्यात आलेले डांबर अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. परिणामी, बांधकाम झालेल्या रस्त्यांची अवस्था एका महिन्यातच खराब झाली. हे डांबर गुजरात आणि मुस्लिम देशांतून आयात केले गेले, ज्यामुळे शहरातील नागरिकांची फसवणूक झाली.
महापालिकेचा पैसा आणि धर्मयोध्द्याचे संबंध
अनिल गोटेंनी पत्रकार परिषदेत अनेक कागदपत्रे व फोटो सादर करून आरोप केला की, धर्मयोध्द्याचे संबंध गुन्हेगार, अवैध व्यवसाय करणाऱ्यांशी असून त्यांनी महापालिकेच्या कामांतून मोठ्या प्रमाणावर पैसा लुटला आहे.
भगवान शंकराची मूर्ती व धार्मिक राजकारणाचा आरोप
अनिल गोटेंनी आरोप केला की, धर्मयोध्द्यांनी हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली धार्मिक भावनांचा गैरवापर केला. शहरात उभारलेल्या भगवान शंकराच्या मूर्तीवरही त्यांनी निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केल्याचा आरोप केला.
महाविकास आघाडीचे आवाहन
गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "धुळेकरांनी आता जागे होऊन या भ्रष्ट व्यवस्थेला धडा शिकवावा." या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली आणि दोषींना तुरुंगात टाकण्याची मागणी केली.
