धुळे दर्पण न्यूज :- देवपूर प्रभाग क्रमांक 2 मधील श्री स्वामी समर्थ नगर येथे ओपन वॉल कंपाऊंड कामाचा शुभारंभ आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित नागरीकांना संबोधित करताना आमदार अग्रवाल यांनी शहराच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.


  कार्यक्रमात माजी महापौर बंद्रांत सोनार, भाजप प्रदेश चिटणीस डॉ. सुशील महाजन, माजी नगरसेवक नंद सोनार, भारतीताई माळी, ज्येष्ठ नेते संजय बोरसे, हिरामण गवळी, गुड्डू अहिरराव, देवपूर पूर्व मंडळ अध्यक्ष सुबोध पाटील, अमोल सूर्यवंशी, संदीप गुरव, प्रकाश सूर्यवंशी, शामकांत देसले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  कार्यक्रमाची सुरुवात भूमिपूजन आणि नारळ वाढवून करण्यात आली. या प्रसंगी बोलताना आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की, "मी आमदार नव्हे तर एक सेवक आहे. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार आहे. श्री स्वामी समर्थ नगर येथे सुरू झालेल्या या कामामुळे परिसरातील नागरीकांना मोठा दिलासा मिळेल. भविष्यातही विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारचा खोळंबा होऊ दिला जाणार नाही."

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

शहर विकासाबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे

  आमदार अग्रवाल यांनी आपल्या भाषणात शहराच्या विकासासाठी काही ठळक मुद्दे मांडले:

1. उद्योगांसाठी प्रयत्न:

  "धुळे शहरात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी उद्योग आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. कालच कलेक्टर साहेबांसोबत या संदर्भात चर्चा करून जागा निश्चितीबाबत काम सुरू केले आहे."


2. हिंदुत्वाची कास आणि सुरक्षितता:

  "शहरात बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीचा प्रश्न गंभीर असून, नागरिकांनी सतर्क राहावे. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिस किंवा प्रशासनाला माहिती द्यावी, ही विनंती आहे."


3. आरोग्यसेवा:

  "लवकरच एक फाऊंडेशन सुरू केले जाईल, ज्याद्वारे गरजू नागरिकांना आरोग्यसेवा पुरवली जाईल. कोणत्याही गरजेसाठी मला संपर्क साधा."


भविष्याची योजना

  आमदार अनुप अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, धुळेकरांच्या आशिर्वादाने शहराचा विकास करण्यासाठी ते प्राधान्य देत आहेत. फक्त रस्ते, लाईट किंवा सौंदर्यीकरण नव्हे, तर रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल.

- Advertisement -


घुसखोरी रोखण्याचे आवाहन

  धुळे शहरात दोन दिवसांपूर्वी बांगलादेशी नागरिक सापडल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे नागरीकांनी सजग राहून शहराच्या सुरक्षिततेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन आमदारांनी केले.


  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी परिश्रम घेतले. प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांनी कामाच्या शुभारंभाबद्दल समाधान व्यक्त केले असून, परिसरात विकासाची गती वाढेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम