नगाव येथील गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत आमदार भदाणे यांनी ही भूमिका स्पष्ट केली. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, उपविभागीय अभियंता डी. पी. ईसे, डी. बी. झाल्टे, के. एन. पाटील यांच्यासह संबंधित शाखा अभियंते, भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य किरण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
कामांबाबत ठेकेदारांना सजगतेचा इशारा
बैठकीत आमदार भदाणे म्हणाले, "कौठळ ते कापडणे या रस्त्याचे काम मंजूर होऊन दोन वर्षे झाली तरीही ठेकेदाराने काम सुरू केलेले नाही. अशा ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा आणि काम दुसऱ्या ठेकेदाराकडे द्या."
त्यांनी धुळे तालुक्यातील नगाव-बिलाडी रस्ता निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आणून ठेकेदाराला नोटीस देण्याचे आदेश दिले. लळिंग-अजनाळे रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून संबंधित ठेकेदारालाही त्यांनी नोटीस देण्याची सूचना केली. तसेच कापडणे-न्याहळोद आणि नंदाणे-सोनगीर रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
रेल्वेमार्गामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मागणी
मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचे काम सध्या सुरू असून त्यामुळे काही चांगले रस्ते खराब झाले आहेत. यावर आमदार भदाणे म्हणाले, "रेल्वेमार्गाचे काम महत्त्वाचे आहे; परंतु या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी रेल्वे विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा." या संदर्भात रेल्वे अधिकारी, जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त बैठक लावण्याची सूचना त्यांनी केली.
अंडरपास आणि सर्व्हिस रोड संदर्भात लक्ष वेधले
धुळे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गांलगत असलेल्या गावांमध्ये अद्यापही सर्व्हिस रोड, गटारींची कामे अपूर्ण आहेत. उड्डाणपुलांच्या अंडरपासमध्ये पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक ठप्प होते. या समस्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन उपाययोजना राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
तलाठी कार्यालयांसाठी तातडीने जागा उपलब्ध करा
तलाठी कार्यालयांसाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी कामे थांबली आहेत. यावर उपाय सुचवत आमदार भदाणे म्हणाले, "ग्रामपंचायतींनी तलाठी कार्यालयांसाठी तातडीने गावठाणची जागा उपलब्ध करून द्यावी." सुरू असलेली कामे दर्जेदार व वेगाने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.
![]() |
| - Advertisement - |
या आढावा बैठकीत आमदार भदाणे यांनी विविध विकासकामांचे सखोल निरीक्षण केले. "ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे विकासकामे रखडणार नाहीत," असे स्पष्ट करत त्यांनी कामांच्या दर्जावर ठामपणे लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले.
– धुळे दर्पण –
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

