धुळे दर्पण न्यूज :- युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, क्रीडा व युवक सेवा नाशिक विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र धुळे आणि मेरा युवा भारत धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन धुळे येथे करण्यात आले. हा महोत्सव श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजी राव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
उद्घाटन समारंभ आणि प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. हितेंद्र पाटील, वनिता समाज धुळे उपाध्यक्षा श्रीमती साधना मानेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी श्रीधर कोठावदे आणि सौ. रेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
स्पर्धांचे प्रकार आणि विद्यार्थ्यांचा सहभाग
जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या महोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धांमध्ये समूह लोकगीते, वक्तृत्व, कविता व कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, तसेच वैज्ञानिक प्रकल्प सादरीकरण यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आपली कला व कौशल्य सादर करत परीक्षकांची वाहवा मिळवली.
वैज्ञानिक प्रकल्प सादरीकरण:
देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील भुवनेश्वरी खैरनार व शशिकांत माळी यांनी ‘हेमिस्फेरिकल सोलर ड्रायर’ उपकरणाचा प्रकल्प सादर करत विजेतेपद मिळवले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
इतर विजेत्यांनीही नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.
पारितोषिक वितरण आणि मान्यवरांचे मार्गदर्शन
सायंकाळी झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात विजेत्यांना स्मृतीचिन्हे आणि प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. लोकनृत्य स्पर्धेत एम. के. शिंदे महाविद्यालय, कुसुंबा विजेता ठरले, तर लोकगीत स्पर्धेत पिंपळादेवी माध्यमिक विद्यालय, मोहाडी संघाने बाजी मारली. चित्रकलेत निकिता वाघ, कविता लेखनात संदीप भामरे, तर नृत्य स्पर्धेत आकांक्षा सोनवणे यांनी आपापल्या गटात यश मिळवले.
जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना म्हटले, “युवा महोत्सव हा तरुण पिढीच्या सर्जनशीलतेला वाव देणारा उपक्रम आहे. यामधून प्रतिभावान युवक पुढे येतात आणि समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देतात.”
महाविद्यालयाचा उत्साह आणि यशस्वी आयोजन
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “आपले छंद जोपासत, निरोगी जीवनशैली राखत विविध क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे,” असे आवाहन केले.
युवा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक प्रा. प्रशांत वाणी, प्रसिद्धी प्रमुख आनंद कुलकर्णी, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
![]() |
| - Advertisement - |
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या जिल्हा युवा महोत्सवाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवी दिशा दिली. सहभागींनी हिरीरीने योगदान देत महोत्सवाला यशस्वी केला. विजेत्या स्पर्धकांना पुढील स्तरावर प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या कौशल्याचा विकास होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
– धुळे दर्पण –
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

