धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांचा सत्कार साक्री रोडवरील पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात आला. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीतर्फे साक्री विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार निवडून आल्याबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात आला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे होते. या वेळी उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन बागुल, माजी अध्यक्ष रविंद्र इंगळे, माजी अध्यक्ष मिलिंद बैसाणे, माजी अध्यक्ष नुरखान पठाण, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशिराम गावित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना आमदार मंजुळा गावित म्हणाल्या, "शेवटी माहेर ते माहेर असते. पत्रकारांचे प्रेम कधीच कमी होत नाही. आपले सहकार्य नेहमीच मला मिळाले आहे, आणि त्याचा मला खूप फायदा झाला आहे. राजकारणात प्रवेश केल्यानंतर देखील पत्रकार बंधूंनी मला नेहमीच सहाय्य केले आहे. विकासकामांमध्ये देखील पत्रकारांचा आधार महत्त्वपूर्ण ठरला आहे."
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
कार्यक्रमाची सुरुवात मनोज गर्दे यांनी प्रास्ताविक करत केली, आणि उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी आभार मानले. यावेळी कोषाध्यक्ष तुषार बाफना, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाठ, माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, नूरखान पठाण, रवी नगराळे, पुरुषोत्तम गरुड, राजेंद्र सोनार, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. मोहन मोरे, दीपक शिंदे, आकाश सोनवणे, जमिल अहमद युसुफ शहा, पंकज पाटील, विरेंद्र मोरे, पुरुषोत्तम पाटील, मनोहर सोळंकी, पंकज पाटील, राकेश गाळणकर, अजिंक्य देवरे, रविंद्र नगराळे, संजय पाटील, दीपक वाघ, गोरख गर्दे, शरद वेंदे, दिनेश निकुंभ यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी, कोअर कमिटीचे सदस्य, माजी अध्यक्ष आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने धुळे जिल्ह्यातील पत्रकार आणि राजकारण्यांमधील चांगली सुसंवादाची उदाहरण प्रस्तुत केली.
– धुळे दर्पण –
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |

