धुळे दर्पण न्यूज :- धुळे महापालिकेकडून सद्यस्थितीत ३६ टक्के दराने मालमत्ता कराची आकारणी केली जात आहे. शेजारील जळगाव, मालेगाव आणि अहिल्यानगर शहरात १५ ते २७ टक्के दराने आकारणी होते. त्यामुळे धुळे महापालिकेने मालमत्ता कर हा २६ टक्के करण्याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी काल मनपाचे माजी स्थायी समिती सभापती सुनिल बैसाणे यांनी आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
बैसाणे यांनी निवेदनात म्हटले की, “शहरातील नागरिकांकडून कर घेतले जात आहेत, मात्र त्यांना अपेक्षित नागरी मुलभूत सेवा देण्यात महापालिका कमी पडते. महापालिका प्रशासनाने नागरिकांना मिळणाऱ्या सेवा सुधारण्यात अधिक लक्ष दिले पाहिजे.”
सुनिल बैसाणे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, “२०१५ मध्ये महापालिकेवर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना, त्यांनी कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता मनपा ठराव क्र. ९४ नुसार मालमत्ता कर २६ टक्के वरून ३६ टक्के केला. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बोजे वाढले आहेत. हा निर्णय एक प्रकारचा निजामी जिझिया कर होता, ज्यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागला आहे.”
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
बैसाणे यांनी पुढे म्हटले की, “शहरातील अनेक अल्पसंख्याक व म्हाडा वस्तीमध्ये अद्याप घरपट्टी व पाणीपट्टी आकारली गेली नाही. ती त्वरीत आकारली गेली तर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल. त्यामुळे, ३६ टक्क्याच्या ऐवजी मालमत्ता कर २६ टक्के ठेवून, नवीन आर्थिक वर्षामध्ये कर आकारणीत सुधारणा करून धुळेकरांना दिलासा द्यावा.”
![]() |
| - Advertisement - |
बैसाणे यांच्या या प्रस्तावावर महापालिका प्रशासन पुढील वेळेस विचार करू, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
– धुळे दर्पण –
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


