धुळे दर्पण न्यूज :- धुळे, 5 डिसेंबर 2024: धुळे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मजबुती देणारे, स्वबळावर आपले अस्तित्व निर्माण करणारे, स्वाभिमानी व निस्वार्थी नेते हिम्मतराव (आबा) पंढरीनाथ पवार यांचे आज रात्री 1:30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने धुळ्यात दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण जिल्हा शोकमग्न झाला आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  हिम्मतराव पवार यांनी धुळे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या उभारणीत मोठा वाटा उचलला होता. भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, महानंद संस्थेचे माजी चेअरमन व संचालक, तसेच दादासाहेब रावल दूध संघाचे माजी चेअरमन व संचालक म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या नेत्यत्त्वामुळे शिंदखेडा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठी ताकद मिळाली.


  त्यांच्या कर्तृत्वामुळे व निस्वार्थी स्वभावामुळे ते पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच आदरणीय होते. पक्षाच्या कार्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि जिल्ह्याच्या विकासासाठी घेतलेले परिश्रम आजही सर्वांच्या स्मरणात राहतील.


परिचय आणि योगदान:

  हिम्मतराव पवार यांनी राजकीय प्रवासामध्ये स्वच्छ प्रतिमा टिकवून ठेवत अनेक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे विचार व तत्त्वज्ञान ग्रामीण भागात पोहोचवले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम यशस्वी झाले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

अंत्यसंस्कार:

  त्यांच्या निधनाने पक्षाने एक महान मार्गदर्शक गमावला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3:00 वाजता विटाई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि समर्थकांवर मोठा आघात झाला आहे.


  धुळे जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ही अपूरणीय हानी मानली जात आहे. हिम्मतराव पवार यांचे योगदान नेहमीच प्रेरणादायी राहील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


– धुळे दर्पण – 

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


- Advertisement -