धुळे दर्पण न्यूज :- 30 जानेवारी 2025 (धुळे दर्पण) – श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य लघवेतन सरकारी कर्मचारी संघ, मंत्रालय मुंबईच्या वतीने आज बैठक आयोजित करण्यात आली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
ही बैठक महाविद्यालयाचे अधिष्ठाता मा. डॉ. सयाजीराव भामरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण मोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. अजित पाठक, कार्यालयीन अधीक्षक श्री. राजेंद्र अहिरे, प्रशासकीय अधिकारी श्री. चंद्रकांत कुमावत, संध्या चौधरी मॅडम तसेच वरिष्ठ लिपिक श्री. सयाजी पाटील, स्टेनो श्री. मानकर नाना आणि स्टेनो श्री. धाकड नाना आदी अधिकारी उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
या बैठकीत वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी खालील प्रमुख मागण्या मांडल्या –
1️⃣ जी.पी.एफ. बिल त्वरित अदा करावे: कर्मचाऱ्यांचे जी.पी.एफ. बिल एक ते दीड महिना उशिराने मिळते. त्यामुळे हे बिल आठ दिवसांच्या आत मिळावे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना आवश्यक वेळी पैसे उपलब्ध होतील.
2️⃣ ओपीडी नोंदणी शुल्क माफ करावे: रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ओपीडी नोंदणी शुल्क मोफत द्यावे.
3️⃣ महात्मा ज्योतिबा फुले योजना भत्ता: या योजनेत अंतर्गत येणाऱ्या रुग्णांच्या ऑपरेशनमध्ये वर्ग 4 कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार त्यांचा भत्ता तात्काळ अदा करावा.
4️⃣ नवीन लिफ्ट त्वरित बसवावी: रुग्णालयात नवीन लिफ्ट मंजूर झालेली असली तरी ती अद्याप बसवलेली नाही. त्यामुळे ती तात्काळ बसवून सुरू करावी.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
अधिष्ठात्यांचे आश्वासन:
या सर्व मागण्यांवर सखोल चर्चा झाली. अधिष्ठाता डॉ. सयाजीराव भामरे यांनी कर्मचाऱ्यांच्या अडचणी गांभीर्याने घेत ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
![]() |
| - Advertisement - |
या बैठकीला महाराष्ट्र राज्य लघवेतन सरकारी कर्मचारी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष श्री. गिरीश भाऊ चौधरी, राज्य सल्लागार श्री. वामनराव पाटील, राज्य विभागीय सचिव श्री. विनोद सोनार, राज्य महिला उपाध्यक्ष श्रीमती सरलाबाई शिरसाट, धुळे जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय बाविस्कर, सफाई कर्मचारी अध्यक्ष श्री. हिरालाल डोंगरे तसेच श्री. संजू खैरनार, श्री. कैलास पवार, श्री. रामदास गोयर, श्री. गणेश गोयर, श्री. धीरज चव्हाण, श्री. उदय मोरे, श्री. सुनील टोप्या, श्री. राहुल वाघ, श्री. सुरज बेंडवाल, श्री. संदीप कंडारे, श्री. अजय डांगोरे व अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमुळे वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जातील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


