"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
शहरातील भाजी विक्रेत्यांचे व्यवस्थापन आणि वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी काल महापालिकेच्या कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, कृउबा संचालक महादेवभैय्या परदेशी, ओम खंडेलवाल, विक्की परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजी विक्रेत्यांसाठी हक्काची जागा:
जुन्या आग्रा रोडवर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, तसेच अपघातांचीही शक्यता वाढते. ही बाब लक्षात घेऊन सर्व विक्रेत्यांना नवरंग टाकी परिसरातील महापालिकेच्या मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होईल तसेच नागरिक आणि विक्रेत्यांसाठी सुरक्षिततेची खात्री दिली जाईल.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
आमदार अनुप अग्रवाल यांनी स्वतः भाजी मंडईतील महिला विक्रेत्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. “तुमचा भाऊ तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही,” असा विश्वास त्यांनी महिला विक्रेत्यांना दिला. भविष्यात पक्की भाजी मंडई उभारण्यासाठीही प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
स्थलांतराचा आराखडा:
आगामी पंधरा दिवसांत नवरंग पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या मैदानात भाजी मंडई स्थलांतरित करण्यात येईल. या जागेवर वॉल कंपाऊंड आणि पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. नागरीकांनीदेखील नवीन ठिकाणाहूनच भाजीपाला खरेदी करून सहकार्य करावे, असे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे.
शहरातील अतिक्रमण निर्मूलन:
धुळे शहरातील पाचकंदिल, अकबर चौक, ताशा गल्ली, ८० फुटी रोड येथील अतिक्रमण हटविण्यासाठीही महापालिकेने पावले उचलली आहेत. गल्लीबोळ मोकळे करून शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या उद्दिष्टाने काम सुरू आहे.
![]() |
| - Advertisement - |
प्रतिक्रिया आणि आभार:
या निर्णयामुळे महिला विक्रेत्यांनी आमदार अग्रवाल यांचे आभार मानले आहेत. “आमचा भाऊ आमच्यासाठी खंबीर आहे,” अशी प्रतिक्रिया महिला विक्रेत्यांनी दिली.
महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल आणि धुळे शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित होईल, असा विश्वास आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला.
– धुळे दर्पण –
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

