धुळे दर्पण न्यूज :- केंद्रीय अर्थमंत्री यांनी आज संसदेत 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक, विशेषतः मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. नव्या कर प्रणालीत १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही. वेतनभोगी करदात्यांसाठी ₹७५,००० स्टँडर्ड वजावटीसह ₹१२.७५ लाखांपर्यंत उत्पन्नावर करमुक्ती देण्यात आली आहे.
नवीन आयकर स्लॅब आणि दर
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
मध्यमवर्गीयांसाठी मोठा फायदा
या नवीन करसवलतीमुळे मध्यमवर्गीय नागरिकांच्या हाती जास्त पैसे राहतील. परिणामी, त्यांचा उत्पन्नातील बचत आणि गुंतवणूक वाढेल. गृहकर्ज, शिक्षण आणि वैयक्तिक खर्चांसाठी अधिक निधी उपलब्ध होणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक वाढीला गती देण्यासाठी विविध घोषणा केल्या आहेत. विशेषतः गृहनिर्माण, पायाभूत सुविधा, स्टार्टअप्स आणि नव्या उद्योगांसाठी मोठ्या गुंतवणुकीची तरतूद करण्यात आली आहे.
![]() |
| - Advertisement - |
नव्या कर संरचनेनुसार, सर्वसामान्य करदात्यांवरील करभार कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नव्या सुधारित स्लॅबमुळे कर भरूनही नागरिकांच्या हाती अधिक पैसा राहणार आहे, ज्यामुळे घरगुती खर्च आणि गुंतवणुकीत वाढ होईल.
काय होणार परिणाम?
*मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक सवलत
*घरगुती खर्च, बचत आणि गुंतवणुकीत वाढ
*स्टार्टअप आणि नव्या उद्योगांना प्रोत्साहन
*रोजगार निर्मितीस चालना
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
सरकारच्या दृष्टिकोनातून
सरकारच्या मते, या नव्या कर संरचनेमुळे देशांतर्गत खप वाढेल, ज्याचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर सकारात्मक परिणाम होईल. तसेच, या निर्णयामुळे जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा करसवलतीच्या बाबतीत मोठा बदल होणार आहे.
(धुळे दर्पण सैय्यद सानिल)
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



