धुळे दर्पण न्यूज :- महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी "लाडकी बहिण" योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा आर्थिक लाभ पात्र लाभार्थ्यांना वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ७ मार्चपासून सुरू झालेली ही प्रक्रिया १२ मार्चपर्यंत चालणार असून, राज्यातील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण ३,००० रुपये जमा केले जातील.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, "फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी १,५०० रुपये असे दोन टप्प्यांमध्ये पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत." महिलांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्या सशक्तीकरणाला चालना मिळावी, यासाठी ही योजना राबवली जात आहे.
![]() |
| - Advertisement - |
महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळावे, त्यांना विविध गरजा पूर्ण करता याव्यात आणि समाजात त्यांचा आत्मसन्मान वाढावा, हा या योजनेचा उद्देश आहे. मागील काही महिन्यांपासून महिलांना या योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्यात येत आहे आणि भविष्यातही हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवला जाणार आहे.
लाभ कसा मिळणार?
लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. या प्रक्रियेत कोणत्याही दलालांचा हस्तक्षेप नसेल, याची काळजी प्रशासन घेत आहे. त्यामुळे लाभार्थींनी अधिकृत सरकारी संकेतस्थळ किंवा स्थानिक प्रशासनाकडूनच अधिक माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
महिला दिनानिमित्त विशेष निर्णय
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाने हा आर्थिक लाभ जलदगतीने वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांचे आर्थिक सबलीकरण हा सरकारच्या अजेंड्यावर महत्त्वाचा मुद्दा असून, भविष्यात अशा अनेक योजनांद्वारे महिला सशक्तीकरणावर भर दिला जाणार आहे.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना वेळेत लाभ मिळावा, यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. महिला व बालविकास विभागाने सर्व महिलांना योग्य वेळी लाभ मिळेल, याची खात्री दिली आहे.
(धुळे दर्पण – सैय्यद सानिल)
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


