धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरात खळबळ उडवणाऱ्या गुड्ड्या ऊर्फ रफीयोद्दीन शफीयोद्दीन शेख हत्या प्रकरणाच्या खटल्यात तीन दिवस चाललेल्या पंच साक्षीदारांच्या उलट तपासानंतर न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगाने सुरू झाली आहे. मोक्का कायद्यांतर्गत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या खटल्याची सुनावणी धुळे मोक्का न्यायालयात मा. न्यायमुर्ती एस.आर. भदगले यांच्या समक्ष सुरू आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
हत्या प्रकरणाचा थरार
गेल्या वर्षी पारोळा रोड कराचीवाला खुंट गोपाल टी येथे गुड्ड्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या पुर्ववैमनस्यातून तसेच कट रचून केल्याचा आरोप आहे. या घटनेत राजेंद्र ऊर्फ भद्रा, विलास गोयर, विक्रम गोयर यांच्यासह एकूण १९ जण आरोपी आहेत. खूनासाठी तलवारी, कोयते, लोखंडी रॉड आणि अगदी बंदुकही वापरण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता, ज्यामुळे देशभर या खून प्रकरणाची चर्चा झाली.
![]() |
| - Advertisement - |
या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे पंच साक्षीदार चंद्रकांत रवींद्र इथापे यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर आरोपी गणेश बिवाल यांच्या वतीने विधीज्ञ तुकाराम म. सुळे यांनी तब्बल दोन तास पंच साक्षीदारांचा उलट तपास घेतला. त्यानंतर दि. ३ मार्च रोजी आरोपी क्रमांक १, ३ आणि ४ तर्फे विधीज्ञ सी.डी. सोनार यांनी तपास केला.
सदर उलट तपास अपूर्ण राहिल्याने तो ४ मार्च रोजी पूर्ण करण्यात आला. त्यानंतर विधीज्ञ राजेंद्र बी. गुजर, विधीज्ञ भावेश वाघमारे, विधीज्ञ निखिल चव्हाण, विधीज्ञ प्रशांत सोनार आणि विधीज्ञ मोहन भंडारी यांनीही उलट तपास केला. विशेष म्हणजे, यापूर्वी विधीज्ञ तुकाराम म. सुळे यांनी घेतलेला तपास बहुतेक वकिलांनी स्वीकारला, त्यामुळे तपासाच्या प्रक्रियेत वेग आला.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
१० मार्चला पुढील सुनावणी
साक्षीदारांच्या उलट तपासाची प्रक्रिया संपल्यानंतर आता पुढील साक्षीदारांच्या साक्षीसाठी १० मार्च २०२५ रोजी सुनावणी होणार आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर काम पाहत आहेत.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

