धुळे दर्पण न्यूज :- महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ६६ वा वर्धापन दिन गुरुवारी, दिनांक १ मे २०२५ रोजी साजरा होत असून, या दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात ध्वजारोहणाचे कार्य जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री मा. जयकुमार रावल यांच्या हस्ते सकाळी ८.०० वाजता होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
महाराष्ट्र दिन हा राज्याच्या अस्मितेचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे. या दिवशी संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. धुळे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.
![]() |
| - Advertisement - |
या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नी, वीरमाता, वीरपिता, शौर्य पुरस्कार विजेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सूचित केले आहे की, १ मे २०२५ रोजी सकाळी ७.१५ ते ९.०० या वेळेत कोणताही शासकीय अथवा निमशासकीय ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. ज्या कार्यालयांना किंवा संस्थांना स्वतःचा ध्वजारोहण समारंभ आयोजित करायचा असेल, त्यांनी तो सकाळी ७.१५ पूर्वी किंवा ९.०० नंतर घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या शासकीय समारंभात पोलीस संचलन, सांस्कृतिक कार्यक्रम, शासकीय योजनांचे माहिती प्रदर्शन, तसेच उत्कृष्ट शासकीय सेवकांचा सत्कार आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शासकीय सोहळ्याचा भाग व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
— सैय्यद सानिल
धुळे दर्पण
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


