धुळे दर्पण न्यूज :- शहरालगतच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल साहिलच्या मागे असलेल्या प्लास्टिक आणि टायरच्या गोडावूनला मंगळवारी सायंकाळी अचानक आग लागून भीषण नुकसान झाले. आगीमुळे परिसरात प्रचंड धावपळ उडाली असून, आगीच्या लोळांनी संपूर्ण गोडावून काही तासांत भस्मसात झाला.
सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्लास्टिक व टायरसारख्या ज्वलनशील वस्तू मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केलं. ५० ते ६० फूट उंच आगीचे लोळ उठताना दिसत होते. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग इतकी भयानक होती की, ती आटोक्यात आणण्यासाठी जवानांना रात्री उशिरापर्यंत झगडावे लागले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या आगीत संपूर्ण गोडावून जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, धुरामुळे परिसरात मोठा त्रास निर्माण झाला होता.
![]() |
| - Advertisement - |
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल व महापालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील रहिवाशांना सुरक्षित अंतरावर हलविण्यात आले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील गोडावूनधारक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशा गोडावूनमध्ये अग्निशमन यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा आणि नियमांचे पालन कितपत होतं, याबाबत नागरिकांतून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



