धुळे दर्पण न्यूज :- शहरातील मोगलाई परिसरात राहणाऱ्या शाहरुख सिद्दिकबाबू शहा (वय अंदाजे २५) या तरुणाच्या पायाला आज गोळी लागल्याची घटना शंभर फुटी रोड परिसरात घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शाहरुख शहा आणि त्याच्या काही मित्रांचा या परिसरातील काही तरुणांशी जुना वाद होता.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
आज सकाळच्या सुमारास शाहरुख शहा चहा पिण्यासाठी शंभर फुटी रोडवरील एका टपरीजवळ थांबला होता. याच दरम्यान, त्याच्या समोरच जुन्या वादातील काही तरुणही उपस्थित होते. दोघांमध्ये वादावादी सुरु झाली आणि पाहता पाहता वाद तीव्र स्वरूप धारण करत गेला.
![]() |
| - Advertisement - |
वादाच्या भरात समोरील आरोपींपैकी एकाने गावठी पिस्तुल काढून शाहरुखवर गोळीबार केला. साक्षीदारांच्या माहितीनुसार, चार गोळ्या झाडण्यात आल्या, मात्र त्यातील एकच गोळी शाहरुखच्या पायावर लागली. घटनेनंतर परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
![]() |
| - Advertisement - |
जखमी शाहरुख शहा याला तात्काळ साक्री रोडवरील सेवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी उपासने साहेब आणि शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळी पाहणी करून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक सक्रिय झाले असून लवकरच आरोपींचा छडा लावला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



