एक कोटी रुपयांच्या निधीतून ५० फूट लांबीचा पूल; सहा महिन्यांत होणार काम पूर्ण, वाहतुकीचा प्रश्न कायमचा सुटणार
![]() |
| - Advertisement - |
या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नाल्याला येणाऱ्या पुरामुळे बंद होणारी वाहतूक आणि नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
🌉 पूल कसा असेल? काय असतील सुविधा?
-
पूल लांबी: ५० फूट
-
रुंदी: ६ मीटर
-
बांधकाम कालावधी: ६ महिने
-
निधी: ₹१ कोटी
-
वैशिष्ट्य: जुन्या फरशी पुलापेक्षा अधिक उंच; पूर आल्यानंतरही वाहतूक सुरळीत राहील
![]() |
| - Advertisement - |
सध्या या ठिकाणी असलेला जुना फरशी पूल अत्यंत खराब स्थितीत आहे. ठिकठिकाणी खड्डे, उखडलेले स्लॅब आणि खचलेला रस्ता यामुळे नागरिकांचे हाल होत होते. प्रत्येक पावसाळ्यात पूर आला की जमनागिरी आणि भीमनगरच्या नागरिकांची वाहतूक बंद होत असे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
हा पूल साक्रीरोड परिसरातील रहिवाशांसाठी एकमेव मुख्य संपर्क रस्ता आहे. त्यामुळे या नव्या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक, सुरक्षितता व सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारेल.
🛠️ काम लवकरच सुरू – रहिवाशांमध्ये समाधान
– धुळे दर्पण –


