धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरवासीयांसाठी मोठी आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून, येत्या काळात शहरात १५ कोटी रुपये खर्चून ५० खाटांचे अत्याधुनिक आयुष हॉस्पिटल उभारले जाणार आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व मंजुरी मिळाल्या असून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. धुळे लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या पाठपुराव्याला मोठे यश लाभले असून यामुळे धुळेकरांना आधुनिक आणि पर्यायी औषध प्रणालीच्या सुविधा मिळणार आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत २०२५-२६ च्या राज्य वार्षिक कृती आराखड्यात १० नवीन आयुष हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत धुळे जिल्ह्याचाही समावेश असून, धुळे शहरात हे हॉस्पिटल उभारले जाणार आहे. खासदार डॉ. बच्छाव यांनी या संदर्भात संसद भवनात थेट पाठपुरावा केला होता. त्यास यश येत, शासनाच्या पातळीवरून निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

  डॉ. बच्छाव म्हणाल्या की, “धुळे जिल्हा आणि विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना आयुष हॉस्पिटलमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. पारंपरिक आयुर्वेद, युनानी, होमिओपथी, सिद्ध आणि योग या उपचार पद्धतींना प्रोत्साहन देणे हे आयुष योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमुळे नागरिकांना पर्यायी उपचाराची दर्जेदार आणि सुलभ सेवा मिळणार आहे.”


हॉस्पिटलसाठी जागेची पाहणी

  हॉस्पिटलसाठी प्रस्तावित जागेची पाहणी नुकतीच करण्यात आली. ३२ कॉर्टर निवासस्थान, गणपती मंदिर मागे, लहान पुलाजवळील जागेची पाहणी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, श्री. भा. ही. शा. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या दौऱ्यात महाविकास आघाडीचे विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे युवराज करनकाळ, रमेश अण्णा श्रीखंडे, पितांबर महाले, माजी विरोधी पक्षनेते हाजी साबीर शेठ, हाजी ईस्माइल पठाण, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीतराजे भोसले, डॉ. दरबारसिंग गिरासे, महिला जिल्हाध्यक्षा उषाताई पाटील, भिवसन अहिरे, सुनील शिंदे, डॉ. दिनेश बच्छाव आदींचा समावेश होता.

- Advertisement -

  धुळे शहराला आधुनिक आयुष हॉस्पिटलची जोड मिळणार असून, आरोग्यसेवा क्षेत्रात हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी यावेळी केले.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम



- Advertisement -