पत्रक क्र. ६५


  धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरात ‘गुलमोहर’ विश्रामगृहातील रूम क्रमांक १०२ मध्ये तब्बल १ कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपये सापडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषद सभापती राम शिंदे यांना एक थेट आणि सडेतोड पत्र लिहून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:


गंभीर आरोप आणि संशयास्पद बैठकांचे आयोजन

  धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या बैठका २१ ते २३ मेदरम्यान झाल्या. या बैठकीसाठी भाजप आमदार अनुप अग्रवाल यांच्या मालकीच्या ‘टॉपलाइन हॉटेल’मध्ये खासगीरित्या बैठकांचे आयोजन करण्यात आले, असा आरोप अनिल अण्णा गोटे यांनी केला आहे.

- Advertisement -

  सामान्य शासकीय इमारती उपलब्ध असताना खाजगी हॉटेलमध्ये बैठक घेतल्यामुळे "विधिमंडळाची प्रतिष्ठा राखली जाते का?" असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नव्हे तर, १५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट लावून अंदाज समितीमधील काही आमदारांना लाच देण्याचे नियोजन असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

कोट्यवधींची रोकड आणि पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष

  गुलमोहर रूममध्ये सापडलेल्या कोट्यवधींच्या रोकडीतून साडेतीन कोटींची रक्कम आधीच लंपास झाली होती, असा दावा पत्रात करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक १२ तासांनीही घटनास्थळी पोचले नाहीत, व चार दिवस उलटूनही कोणताही गुन्हा दाखल केला गेला नाही, ही बाब गोटेंनी अत्यंत तीव्र शब्दात मांडली आहे.

- Advertisement -

पत्रकारांवर बंदी, अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि ‘स्वीय सहाय्यक’चा गोंधळ

  या बैठकीत बरेच ‘अनाहूत पाहुणे’ हजर होते, पण पत्रकारांना मात्र प्रवेश नाकारण्यात आला, असेही त्यांनी निदर्शनास आणले आहे. विशेष म्हणजे बैठकीचे संचालन श्री. किशोर पाटील या कथित ‘स्वीय सहाय्यक’मार्फत करण्यात आले होते. मात्र, यांची नेमणूक अधिकृत नसल्याचे विधानसभेच्या अध्यक्षांनी स्पष्ट केल्याचेही गोटेंनी नमूद केले.


गंभीर प्रश्नांची सरबत्ती

पत्रात पुढील मुद्दे थेट उपस्थित करण्यात आले आहेत:


• किशोर पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती आदेश देतील लागते, ही राज्याच्या गृहखात्याची दयनीय अवस्था.


• पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याआधीच चौकशी सुरू केली, हे कोणत्या कायद्याअंतर्गत?


• सीसीटीव्ही फुटेज व कॉल रेकॉर्ड अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाहीत, हे दुर्लक्ष की षडयंत्र?


• गुन्हा नोंदवला नसताना चौकशी सुरू करणारी पोलिस यंत्रणा न्यायालयात टिकेल का?


‘मी तुमचा ऋणी राहीन’ - भावनिक शेवट

  गोटेंनी आपल्या पत्राच्या शेवटी लिहिले आहे की, “माझ्या पत्रातील सर्व मुद्द्यांचा खुलासा लवकरात लवकर व्हावा. जर उत्तर देणे अडचणीचे असेल तर तसे मला कळवावे, मी आजन्म ऋणी राहीन.”

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


- Advertisement -