धुळे दर्पण न्यूज :- आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गोवंश तस्करीस प्रतिबंध घालण्यासाठी धुळे पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सन २०१९ पासून गोवंश बंदी कायद्यान्वये विविध गुन्ह्यांत अडकलेल्या आठ सराईत आरोपींना चार दिवसांसाठी (६ जून ते ९ जून २०२५) धुळे शहरातून हद्दपार करण्यात आले आहे.
![]() |
| - Advertisement - |
सदर कारवाई आझाद नगर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आली असून, या आरोपींवर याआधी देखील गोवंश तस्करी व गोहत्या प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही कारवाई केल्याची माहिती दिली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे व पत्ते पुढीलप्रमाणे –
- मोहम्मद कलीम मुक्तार अहमद कुरेशी (वय २६) – रा. सिराज पहलवान गल्ली, मौलवीगंज, धुळे
- सलमान अब्दुल मन्नान अन्सारी (वय ४०) – रा. तल्हा मशिद जवळ, फिरदोस नगर, धुळे
- जाकीर हुसैन महेमुद अन्सारी ऊर्फ जाकीर काल्या (वय ३९) – रा. ग. नं. १४, जाकीर डॉक्टर दवाखाना, नाल्याजवळ, धुळे
- शेख जावेद शेख अजीज (वय ४४) – रा. कुबा मशिद जवळ, आशियाना नगर, धुळे
- मोहम्मद शाबान अब्दुल हक्क अन्सारी (वय ४३) – रा. नंदी रोड, रातराणी हॉटेल जवळ, फिरदोस नगर, धुळे
- नियाज अहमद अब्दुल रशिद अन्सारी (वय ५०) – रा. ग. नं. १४, मक्का मशिद जवळ, माधवपुरा, धुळे
- मोहम्मद जुनैद मुख्तार अन्सारी (वय २८) – रा. ग. नं. १४, मक्का मशिद जवळ, माधवपुरा, धुळे
- अबरार अहमद अब्दुल सत्तार (वय २७) – रा. ग. नं. १४, मक्का मशिद जवळ, माधवपुरा, धुळे.
![]() |
| - Advertisement - |
या सर्व आरोपींना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अंतर्गत शहरबंदीची नोटीस बजावण्यात आली असून, संबंधित काळात शहराच्या हद्दीत त्यांना वावर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
ही कारवाई आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र महाले आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी गौतम सपकाळे, योगेश शिरसाठ, संदीप कढरे, शांतिलाल सोनवणे, रफिक पठाण, विजय शिरसाठ, अनिल शिंपी, मक्सुद पठाण, पंकज जोंधळे यांनी केली.
![]() |
| - Advertisement - |
शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलीस प्रशासनाने दिला आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

.jpg)

