धुळे दर्पण न्यूज :- शहरातील चाळीसगाव रोडवरील कनोसा हायस्कूल आणि सागर बेकरी परिसरात बुधवारी (दि. २५ जून) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एका तरुणाने दारूच्या नशेत धिंगाणा घालत पंचर दुकान चालवणाऱ्या दुकानदारावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
हल्ल्यानंतर आरोपीने दुकानातील कॉम्प्रेसर मशीन आणि इतर साहित्य उचलून रस्त्यावर फेकले. त्यामुळे केवळ शारीरिकच नव्हे तर आर्थिक नुकसानही दुकानदाराचे झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलीस स्टेशनचे नगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, हल्लेखोराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली आहेत.
![]() |
| - Advertisement - |
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे. स्थानिक नागरिकांनी अशा विकृत आणि समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.



