धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक लांडोर बंगला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅली व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे स्वतः उपस्थित राहून अभिवादन करणार आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमाबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी २८ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता पत्रकार भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
🔹 ऐतिहासिक पार्श्वभूमी:
३१ जुलै १९३७ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोर्टाच्या कामासाठी धुळे येथे आले असता, त्यांनी लळींग येथील फेरिस्टचे रेस्ट हाऊस लांडोर बंगला येथे तीन दिवस मुक्काम केला होता. त्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी ३१ जुलै रोजी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करतात. गेल्या ८८ वर्षांनंतर यंदा बाबासाहेबांचे वंशज सुजात आंबेडकर यांची उपस्थिती हा विशेष उत्साहाचा भाग ठरणार आहे.
 |
| - Advertisement - |
🔹 कार्यक्रमाची रूपरेषा:
३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, बसस्टँड धुळे येथून भव्य मोटरसायकल रॅली सुरू होईल. ही रॅली जेल रोड, नवीन व जुनी महानगरपालिका, शिवाजी महाराज स्मारक, अग्रसेन महाराज स्मारक, स्टेशन रोड, दसरा मैदान, अवधान मार्गे लांडोर बंगला येथे पोहोचेल. या रॅलीत हजारो कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक सहभागी होणार आहेत.
रॅलीच्या समारोपानंतर लांडोर बंगला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समता सैनिक दलाच्या वतीने आणि सुजात आंबेडकर यांच्या हस्ते अभिवादन केले जाईल. त्यानंतर सुजात आंबेडकर हे अभिवादन सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
🔹 सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम:
या कार्यक्रमात पंडित घनश्याम थोरात यांचे भीम गीत गायनाचा प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण हे या उपक्रमाचे नेतृत्व करणार आहेत.
🔹 वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित:
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, उ. महा उपाध्यक्ष रविकांत वाघ, माजी नगरसेवक जितुभाऊ शिरसाठ, जिल्हा संघटक शंकरअण्णा खरात, शहराध्यक्ष विशाल महाले, जिल्हा उपाध्यक्ष आकाश बागुल व चंद्रमणी वाघ, युवा जिल्हाध्यक्ष योगेश पगारे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण, युवा उपाध्यक्ष राहुल पाटोळे हे विशेष मेहनत घेत आहेत.
🔹 सर्वांना सहकार्याची विनंती:
वंचित बहुजन आघाडीने सर्व आंबेडकरी अनुयायी, कार्यकर्ते, युवक आणि नागरिकांना या अभिवादन सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण – (आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
.jpg) |
| - Advertisement - |