धुळे दर्पण न्यूज :- शहरालगत असलेल्या वरखेडी फाट्याजवळील उड्डाणपुलावर बुधवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा डेपोमधून आलेल्या मालवाहतूक एसटी बसच्या चालकाच्या छातीत अचानक तीव्र स्वरूपाची कळ आल्याने अपघात झाला. चालकाने प्रसंगावधान राखत मोठा अपघात टाळला असला, तरी या घटनेनंतर डिझेल चोरी करताना काही नागरिकांनी आपल्या बेशरमपणाचा कळस गाठला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
घटनेचा सविस्तर आढावा
अक्कलकुवा डेपोची मालवाहतूक बस (MH-20 BL-3025) बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास धुळे शहरातील अवधान एमआयडीसी येथील डेपोमधून बाहेर पडली होती. मुंबई-आग्रा महामार्गावर वरखेडी फाट्याजवळील उड्डाणपुलावर आली असता, चालकाच्या छातीत अचानक कळ आल्याने त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली.
![]() |
| - Advertisement - |
अपघात टाळण्यासाठी चालकाने प्रसंगावधान राखत बस दुभाजकावर चढवली. यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी, बसचे पुढील दोन्ही चाके निखळली आणि इंधन टाकीचा जाड पत्रा फाटल्यामुळे टाकीतील डिझेल बाहेर सांडू लागले.
नागरिकांनी दाखवली माणुसकी, तर काहींनी लाजही सोडली
घटनेनंतर महामार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. चालकाला तातडीने भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेचे उपजिल्हा व्यवस्थापक जयेश पाटील, चालक रवींद्र पवार आणि डॉ. फेजल शहा यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत केली.
दुर्दैवाची बाब म्हणजे, याच दरम्यान काही नागरिकांनी डिझेल सांडत असल्याचे पाहताच प्लास्टिकच्या कॅनसह हजर होत डिझेल भरायला सुरुवात केली. हे पाहून काही नागरिकांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता, त्यापैकी एक व्यक्ती निर्लज्जपणे म्हणाला, “इसमे गैर क्या है? बनाओ मेरा व्हिडिओ, सोशल मीडियापर अपलोड करो. मै डरता नहीं किसीसे!”
या उर्मटपणामुळे उपस्थित नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. मात्र पोलिसांची चाहूल लागताच संबंधित व्यक्ती पळ काढताच दिसून आला.
![]() |
| - Advertisement - |
पोलिस तपास सुरू
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आझाद नगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिकृत माहिती नंतर उपलब्ध होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
धुळे शहरातील शिस्त व संस्कृतीवर प्रश्नचिन्ह
या घटनेने एकीकडे चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळल्याचे समाधान दिले असले, तरी अपघातानंतरच्या काही नागरिकांच्या गैरकृत्यांमुळे धुळे शहराच्या सामाजिक जाणीवांवर आणि शिस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



