मोहाडी पोलिसांची मोठी कारवाई : ऑक्सिटोसिनचा साठा जप्त, एकास अटक

  धुळे दर्पण न्यूज :- जनावरांना दुभत्या अवस्थेत ठेवण्यासाठी अवैधरीत्या वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा मोठा साठा मोहाडी पोलिसांनी जप्त केला आहे. मालेगावहून धुळ्याकडे येणाऱ्या रिक्षावर मोहाडी पोलिसांनी अवधान फाट्यावर सापळा रचून छापा टाकला असता, १८० इंजेक्शनचे १० बॉक्स असा सुमारे ३७ हजार ८०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी रिक्षाचालक अब्दुल सलाम निसार अहमद (वय ५६, रा. गुलशेर नगर, मालेगाव) याला अटक करण्यात आली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  मोहाडी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की, मालेगाव येथून एक व्यक्ती एमएच ४१ सी ३४५९ क्रमांकाच्या रिक्षातून जनावरांना पाणावण्यासाठी लागणारे ऑक्सिटोसिन इंजेक्शन घेऊन धुळ्याकडे येत आहे. या माहितीच्या आधारे मोहाडी पोलिसांनी अवधान फाट्यावर सापळा रचला. काही वेळातच संशयित रिक्षा त्या ठिकाणी आली. पोलिसांनी रिक्षाची तपासणी केली असता, संभाव्य ऑक्सिटोसिनचे १० बॉक्स सापडले, ज्यात एकूण १८० इंजेक्शन होते.

- Advertisement -

  रिक्षाचालकाकडे या औषधांच्या वाहतुकीबाबत कुठल्याही प्रकारचा परवाना किंवा कायदेशीर कागदपत्रे नव्हती. त्यामुळे मोहाडी पोलिसांनी सुमारे ३७ हजार ८०० रुपये किमतीचे इंजेक्शन व अंदाजे ५० हजार रुपये किमतीची रिक्षा असा एकूण ८७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस कॉन्स्टेबल चेतन झोळेकर यांनी याबाबत फिर्याद दाखल केली असून, मोहाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह उपनिरीक्षक नितीन करंडे, मोहन पाटील, हेड कॉन्स्टेबल सचिन वाघ, पंकज चव्हाण, चेतन झोळेकर, जितेंद्र सैंदाणे आणि रमेश शिंदे, मंगल पवार यांचा सहभाग होता.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  गौरतलब आहे की, ऑक्सिटोसिन हे हार्मोनल औषध असून, जनावरांना जबरदस्तीने जास्त दूध देण्यासाठी याचा वापर केला जातो. मात्र, याचा जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, त्यामुळे अशा प्रकारचा वापर कायद्याने गुन्हा मानला जातो. मोहाडी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे या अवैध धंद्याला चांगलाच आळा बसेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -