धुळे दर्पण न्यूज :- वैज्ञानिक, पुरोगामी व आधुनिक विचारांचे प्रबोधन करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या मराठा सेवा संघ या संघटनेच्या विचारधारेचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय पाटील हे उत्तर भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली प्रदेश कार्यकारिणीच्या विशेष बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
बैठकीत बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, “बहुजन समाजासह समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपाययोजना आणि उपक्रम हाती घेऊन सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठा सेवा संघाने हजारो लेखक-वक्ते आणि कोट्यवधी वाचक निर्माण करून समाजात परिवर्तन घडवून आणले आहे. जुन्या रूढी-परंपरा व अंधश्रद्धांपासून मुक्त होण्याचा संदेश देत संघाने लोकजागृती घडवून आणली. यामुळे अनावश्यक खर्च टळून मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी समाजातील तरुण आज मोठमोठ्या प्रशासकीय पदांवर विराजमान झाले असून विविध क्षेत्रांत त्यांची उल्लेखनीय कामगिरी दिसून येत आहे.”
![]() |
| - Advertisement - |
संघाच्या कार्याचा विस्तार केवळ देशभरातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संघाचा प्रत्येक कार्यकर्ता केडरबेस व्हावा, यासाठी आगामी २० व २१ सप्टेंबर २०२५ रोजी दिल्ली येथे उत्तर भारतातील पदाधिकाऱ्यांसाठी केडर कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या शिबिराचे आयोजन राष्ट्रीय महासचिव श्री. प्रदीप पाटील, सुप्रसिद्ध अधिवक्ता अॅड. आकाश काकडे (राष्ट्रीय अध्यक्ष, न्यायदान कक्ष) व श्री. कमलेश पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा समन्वय कक्ष) यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
या प्रसंगी प्रदेश महासचिव प्रा. आदेश मुळे, तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. श्री. कमलेश पाटील यांनी बौद्धिक व प्रबोधनात्मक विचार मांडून संघटनेच्या सामाजिक कार्याची दिशा स्पष्ट केली.
बैठकीत ठरविण्यात आले की, संघाचे कार्य उत्तर भारतातील प्रत्येक राज्यात रुजविण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या जातील. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील प्रकल्पांसोबतच युवक-युवतींसाठी मार्गदर्शन शिबिरे, महिला सबलीकरण उपक्रम, तसेच शेतकऱ्यांसाठी विविध उपयुक्त योजना हाती घेण्यात येतील.
डॉ. पाटील यांनी शेवटी आवाहन केले की, “मराठा सेवा संघ हा केवळ मराठा समाजापुरता मर्यादित नसून तो बहुजन समाजाच्या उत्थानासाठी कार्य करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास साधून एक सुजाण, सक्षम आणि जागरूक समाज घडविणे हेच आमचे ध्येय आहे.”
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
👉 यामुळे संघटनेच्या कार्यात नवीन उर्जा निर्माण झाली असून, उत्तर भारतातील कार्यकर्त्यांमध्ये आगामी केडर कॅम्पबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


