धुळे दर्पण न्यूज :- बीड – धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काल (३० ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने बीड जिल्हा हादरला. पायी देवदर्शनाला जात असताना भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडल्याने जागीच चौघांचा मृत्यू झाला, तर दोघांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  मृतांमध्ये — दिनेश दिलीप पवार (माऊली नगर बीड), पवन शिवाजी जगताप (अंबिका चौक बीड), अनिकेत रोहिदास शिंदे (शिदोड ता. बीड), किशोर गुलाब तोर (बाभूळतारा ता. गेवराई), आकाश अर्जुन कोळसे (रिलायन्स पंप परिसर बीड) आणि विशाल श्रीकिसन काकडे (वय २२, शेकटा ता. शेगाव) यांचा समावेश आहे. हे सर्वजण पायी चालत पेंडगाव येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी जात होते.

- Advertisement -

  नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ एसआर जीनिंगजवळ हा अपघात झाला. भरधाव कंटेनरने मागून सहाही यात्रेकरूंना चिरडले. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी दोघांनी उपचारादरम्यान प्राण गमावले.

  कंटेनरच्या दोन्ही चालकांना बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातातील मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून या दुर्घटनेमुळे जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  महामार्गावर सर्व्हिस रोड नसल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याची स्थानिकांची प्रतिक्रिया आहे. प्रशासनाने अपघातप्रवण ठिकाणांची तातडीने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -