धुळे दर्पण न्यूज :-  धुळे शहरातील पाचकंदील परिसरात पोलिसांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भर रस्त्यात, नागरिकांसमोरच वाहतूक शाखेतील दोन पोलिसांना मारहाण करण्यात आली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सतीश फुलपगारे आणि दीपक शेंगदाणे हे नियमित गस्त घालत असताना त्यांनी आपली पोलिस गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. चौकशीअंती गाडी चालवणारा चालक सोपान पाटील (रा. सडगाव, ता. धुळे) हा पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे उघड झाले.


  धडकेनंतर पोलिसांनी त्याला थांबवून जाब विचारला असता, आरोपीने संतापाच्या भरात दोन्ही पोलिसांवर शिवीगाळ केली आणि प्रत्यक्ष कानाखाली लगावली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी या प्रकाराचा व्हिडिओ चित्रीत केला आहे. पाचकंदील भागात मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काही ऐकण्यास तयार नव्हता.

- Advertisement -

  त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयात आणल्यानंतरही त्याने गोंधळ घातला व आवारातील साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केल्याचे सांगितले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या घटनेमुळे “स्वतःच्या सुरक्षिततेसाठी असलेले पोलिसच असुरक्षित होत आहेत का?” असा सवाल उपस्थित झाला आहे. पोलिसांवर भरदिवसा नागरिकांसमोर हल्ला झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली असून कायद्याविषयीचा धाक कमी झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


  पोलिसांकडून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


- Advertisement -