धुळे दर्पण न्यूज :- शहरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक जागृतीसाठी अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळतर्फे रविवारी दिनांक २४ ऑगस्ट रोजी भव्य ‘माता माधवी मेगा कॅन्सर सेमिनार’ आयोजित करण्यात आला आहे. हा सेमिनार धुळे शहरातील अग्रवाल विश्राम भवन, नदीकिनारा येथे सायंकाळी ४ ते ६ या वेळेत होणार असून, यामध्ये कॅन्सरविषयक तज्ञ डॉक्टरांचे अमूल्य मार्गदर्शन धुळेकरांना मिळणार आहे.

  या संदर्भात माहिती देण्यासाठी साक्री रोड येथील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  सेमिनारमध्ये मुंबई येथील सुप्रसिद्ध जसलोक हॉस्पिटलचे नामवंत कॅन्सर तज्ञ डॉ. रितु जैन, डॉ. सुनिल चोपडे, डॉ. गौरव ललवाणी, डॉ. प्रवीण अग्रवाल, डॉ. शिल्पा अग्रवाल आणि डॉ. आशिष जैन हे आपले मार्गदर्शन करणार आहेत. महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरच्या विविध प्रकारांबाबत माहिती, त्यावरील प्रतिबंधक उपाययोजना तसेच योग्य वेळी घेतलेली काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

- Advertisement -

  विशेषतः तोंडाचा कॅन्सर आणि सर्वाइकल कॅन्सरवरील लसीकरण, त्याचे फायदे व महत्व, तसेच रक्ताशी संबंधित कॅन्सरची काळजी याबाबत नागरिकांना शास्त्रीय व चिकित्सकीय माहिती दिली जाणार आहे. सेमिनारदरम्यान उपस्थितांना डॉक्टरांशी थेट संवाद साधण्याची, प्रश्न विचारण्याची आणि चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

  सेमिनारनंतर मंडळातर्फे उपस्थितांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे. धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या सेमिनारला उपस्थित राहून आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष, सचिव व विश्वस्त मंडळाने केले आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  पत्रकार परिषदेत अभिषेक अनिल अग्रवाल, गिरीश जुगलकिशोर अग्रवाल, निलेश राधेश्याम गेंदोडिया, सुबोध नारायण अग्रवाल, कौशिक नरेश अग्रवाल, पवन सुभाष अग्रवाल, पवन दीपक अग्रवाल, स्वपनेश मोदी, महेश अग्रवाल, निकुंज अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -