धुळे दर्पण न्यूज :- लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) ही महाराष्ट्रासह देशभरात संघटन विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीसोबत लढविण्याचा निर्णय घेतल्याचे लोजपाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी जाहीर केले. धुळे येथील साक्री रोडवरील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

  या वेळी प्रदेशाध्यक्ष कुदळे यांच्यासह प्रदेश महासचिव डॉ. अशोक गायकवाड, राजेश छाजेड, राहुल चव्हाण, जिल्हाध्यक्ष दिलीपआप्पा साळवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शोभाताई चव्हाण, जिल्हा महासचिव कुंदन खरात, शहराध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा संघटक सागर धिवरे, कल्याण गरूड आदी मान्यवर उपस्थित होते.

दलित समाजाचा निधी इतरत्र वळवू नयेइशारा

  पत्रपरिषदेत बोलताना कुदळे यांनी सांगितले की, “दलित समाजासाठी असलेला निधी इतरत्र वळविण्यात आल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू” असा इशारा त्यांनी शासनाला दिला. तसेच महायुतीतील मित्रपक्षांनी लोक जनशक्ती पार्टीला आगामी निवडणुकांमध्ये सन्मानाचे स्थान दिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

धुळ्यात विभागीय मेळावा

  प्रदेशाध्यक्ष कुदळे यांनी माहिती दिली की, धुळे शहरातील रचना हॉल येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध पक्षातील पदाधिकारी लोजपामध्ये प्रवेश करणार असून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पुढील दिशा ठरविली जाणार आहे.

लोजपाचा राष्ट्रीय विस्तार

  लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) हा राष्ट्रीय स्तरावरील प्रभावी पक्ष असून बिहारमध्ये ५ खासदार, नागालँडमध्ये २ आमदार, राजस्थान आणि झारखंडमध्ये आमदार निवडून आलेले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. पक्षाचे संस्थापक पद्मभूषण स्व. रामविलास पासवान यांनी केंद्रीय मंत्रीपदाच्या काळात मोफत धान्य वितरण, शेतकऱ्यांसाठी खत योजना, मंडल आयोगाची अंमलबजावणी यासह अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या. त्यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत पक्ष आज देशभर विस्तारत असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातील लोजपाची भूमिका

  राष्ट्रिय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात संघटनाला गती मिळाली असून विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लोजपाने सातत्याने सहभाग नोंदविला आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये लोजपा महायुतीसोबत राहून निवडणूक लढवेल, अशी भूमिका जाहीर करण्यात आली.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

धुळेकरांची रेल्वेची मागणी

  धुळेकरांच्या दीर्घकाळच्या मागणीचा उल्लेख करताना प्रदेशाध्यक्ष कुदळे म्हणाले की, धुळे स्थानकातून पुणे, कोल्हापूर व दक्षिण भारतासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करण्यासाठी पक्षाचे केंद्रीय मंत्री चिराग पासवान विद्यमान रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहेत.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -