महाराष्ट्र निरीक्षण – धुळे : शिरपूर तालुक्यातील शेमल्या गावचा सुपुत्र व भारतीय सैन्य दलातील जवान दिनेश तुफान पावरा (वय ३०) याने देशसेवेत कर्तव्य बजावत असताना लडाख येथे वीरमरण पत्करले. सुरुंग फुटल्याने उडालेला दगड अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण धुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
Follow the महाराष्ट्र निरीक्षण channel on WhatsApp:
मिळालेल्या माहितीनुसार, लडाखमध्ये रस्त्याचे काम सुरू होते. मोठमोठे दगड फोडण्यासाठी ठिकठिकाणी सुरुंग लावण्यात आले होते. यापैकी एक सुरुंग फुटल्याने दगड उडून पावरा यांच्या अंगावर पडला. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
![]() |
| - Advertisement - |
दिनेश पावरा हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) मध्ये कार्यरत होते. देशसेवेची ओढ मनात बाळगून त्यांनी दोन वर्षांपूर्वीच अग्निवीर म्हणून सैन्यात प्रवेश केला होता. कमी वेळातच देशासाठी प्राणार्पण करून त्यांनी शौर्याचे उदाहरण घालून दिले.
दरम्यान, जवानाचे पार्थिव गावी आणण्यात येणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी, आई-वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे.
आहेत. "बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या घटनेची माहिती मिळताच शेमल्या गावासह संपूर्ण शिरपूर तालुक्यात दुःखाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांसह नातेवाईकांवर शोककळा पसरली असून, "देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सुपुत्राचा आम्हाला अभिमान आहे" अशा भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
![]() |
| - Advertisement - |


