जिल्हाधिकारी विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

   धुळे : शहरातील आझाद नगर व देवपूर परिसरातील झोपडपट्टीवासीयांना अखेर सातबारा उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी या संदर्भात ठोस भूमिका मांडली. झोपडपट्टीवासीयांना ७/१२ देऊन त्यांना कायदेशीर हक्क मिळावा, तसेच अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी खासदारांनी बैठकीत केली.

Follow the महाराष्ट्र निरीक्षण channel on WhatsApp:

   या बैठकीत झोपडपट्टीवासीयांना सातबारा उतारे देणे, शासकीय जमिनींचे कायदेशीर रूपांतर करणे, तसेच PMAY (प्रधानमंत्री आवास योजना) अंतर्गत शहरातील झोपडपट्ट्यांना मान्यता देऊन त्यांना ७/१२ देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून, प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

  खासदार बच्छाव यांनी सिताणे (ता. धुळे) येथील आत्महत्याग्रस्त तरुण शेतकरी निलेश गबरू राठोड यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याचीही मागणी केली. शेतकऱ्यांचे पंचनामे जलद गतीने पूर्ण करून त्यांना मदत देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  बैठकीत आझाद नगर परिसरातील सर्वे क्रमांक ३७७, तसेच देवपूर, विटाभट्टी, आणि लाला सरदार नगर भागातील झोपडपट्टीधारकांना ७/१२ उतारे देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


  या बैठकीला जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, महसूल विभागाचे अधिकारी, नगरपालिकेचे प्रतिनिधी, आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

  धुळेकर झोपडपट्टीवासीयांना आता स्वतःच्या जमिनीचा कायदेशीर हक्क मिळणार असून, शेतकऱ्यांनाही दिलासा देणारे हे निर्णय ठरणार आहेत.

महाराष्ट्र निरीक्षण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : maharashtranireekshana@gmail.com

सर्व सामान्यांच्या न्याय हक्कांसाठी...

महाराष्ट्र निरीक्षण

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम