बीड – ऊसदर वाढीसाठी शेतकरी संघटनांनी सुरू केलेले आंदोलन चांगलेच तीव्र झाले असून रविवारी जिल्ह्यातील सुमारे १०० गावांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी टायर जाळून साखर कारखानदारांना इशारा दिला. या पार्श्वभूमीवर आज (सोमवार, २४ नोव्हेंबर) पासून माजलगाव येथे बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू होणार आहे.

शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, युवा शेतकरी संघर्ष समिती यांसह विविध संघटनांनी एकत्र येऊन ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार, वाहतूक ठेकेदार व मुकदम यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे.

राज्याची महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच जॉईन करा


शेतकऱ्यांनी ऊस दराचा प्रश्न चर्चेतून सोडविण्याचा प्रयत्न केला होता मात्र कारखानदार आणि प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनाचा स्वर अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र दिसत आहे. गावागावांत पेटलेल्या टायरच्या धुरातून सरकार व साखर कारखानदारांना 'शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला’ असा संदेश देण्यात आल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.

Advertisement

आंदोलनात सहभागी संघटनांनी शेतकऱ्यांना आजच्या चक्काजाम आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करताना, "शोषणाविरुद्ध आवाज बुलंद करा आणि रास्त हमीभाव मिळेपर्यंत लढा थांबवू नका" असा निर्धार व्यक्त केला आहे.

राज्याची महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच जॉईन करा


ही लढाई शेतकऱ्यांच्या हक्कांची असून ऊसाला योग्य दर मिळावा यासाठी संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.


📍 महाराष्ट्र निरीक्षण — विश्वसनीय, संक्षिप्त आणि सत्य माहिती.