धुळे दर्पण न्यूज:- धुळे: चाळीसगाव रोड परिसरातून हद्दपार तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी, 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. चाळीसगाव रोड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या तरुणाने आदेशाच्या भंग करून बेकायदेशीरपणे धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात प्रवेश केला होता.
तरुणाचे नाव हासीम हारून पिंजारी उर्फ पापा गोल्डन (वय 30) असे आहे. धुळे उपविभागीय दंडाधिकारी यांनी हद्दपारीचे आदेश पारित केले होते, परंतु त्याने या आदेशाचा भंग केला. गुरुवारी, 19 सप्टेंबर रोजी, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, चाळीसगाव रोड पूर्व हुडको परिसरात हा तरुण फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.