धुळे दर्पण न्यूज :- प्रभाग क्रमांक १६ मधील सोमेश्वर नगर (नकाणे तलाव) परिसरातील नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी ठाम पाऊल उचलत धुळे महापालिकेकडे आपले मागणे सादर केले आहे. नवनाथ हॉटेल ते सोमेश्वर नगर (नकाणे तलाव) दरम्यानचा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता डांबरीकरणासाठी मंजूर असूनही काम अद्याप सुरू झालेले नाही. तसेच, अमृत योजनेअंतर्गत ७०० ते ८०० घरांसाठी पाणीपुरवठा करायचा असल्याचे मंजूर असून त्या कामालाही गती मिळालेली नाही.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
परिसरातील नागरिकांनी या समस्यांबाबत नुकतेच धुळे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले. हरिश्चंद्र लोंढे, मनोज माळी, राजेंद्र सोनवणे, कुणाल खैरनार, आणि भगवान अहिरे यांच्यासह अनेक नागरिकांनी या निवेदनाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली.
नागरिकांच्या समस्या गंभीर
निवेदनात नमूद केल्यानुसार, या परिसरातील नागरिक गेल्या ८ ते १० वर्षांपासून नियमित मालमत्ता कर भरत असूनही त्यांना नागरी सुविधा मिळत नाहीत. रस्ते, गटार, पथदीवे आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने येथील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते. खराब रस्त्यांमुळे जागोजागी खड्डे पडले असून, रस्त्यावर पाणी साचल्याने पायी चालणेही अवघड होते.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
मंजुरी असूनही काम प्रलंबित
महापालिकेने या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ७९ लाख ९९ हजार रुपयांची निधी मंजुरी दिली आहे. तसेच २३ सप्टेंबर २०२४ रोजी निविदाही काढण्यात आली होती. मात्र, अद्याप काम सुरू झालेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
हायवेच्या पलीकडील ७०० ते ८०० घरांसाठी अमृत योजनेअंतर्गत पाण्याची टाकी आणि पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. मात्र, हे काम अद्याप थांबलेले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांनी या कामाला गती देण्याची मागणी केली आहे.
नागरिकांचे आग्रह
नागरिकांनी महापालिकेकडे ठाम मागणी केली आहे की, नवनाथ हॉटेल ते नकाणे तलाव हा दोन किलोमीटरचा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करून तयार करण्यात यावा. तसेच अमृत योजनेतील पाण्याची टाकी बांधून पाईपलाईन टाकण्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे.
![]() |
| - Advertisement - |
यावेळी उपस्थित नागरिकांचे मत
हरिश्चंद्र लोंढे यांनी यावेळी सांगितले, “आम्ही मालमत्ता कर नियमित भरत असतानाही आम्हाला मूलभूत सुविधा मिळत नाहीत, ही धुळे महानगरपालिकेसाठी लाजिरवाणी बाब आहे. प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर पुढील आंदोलन उभे करण्याची वेळ येईल.”
– धुळे दर्पण –

