Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
जिल्हास्तरीय पंच परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना राज्यस्तरीय पंच परीक्षेत सहभागी होण्याचा मार्ग खुला होईल. त्यामुळे या परीक्षेला क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटक, जिल्ह्यातील क्रीडा मंडळांचे सदस्य, तसेच जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर खेळलेले कबड्डीपटू यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
धुळे जिल्ह्याच्या महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच जॉईन करा Group 1
परीक्षेचे उद्दिष्ट
या परीक्षेचा मुख्य उद्देश म्हणजे जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंमध्ये प्रशिक्षित पंच घडवणे आणि स्थानिक पातळीवर कबड्डीच्या आयोजन व नियोजनाला गती देणे. पंचांच्या गुणवत्तेमुळे स्पर्धांमध्ये प्रामाणिक व योग्य निर्णय होऊन खेळाचा दर्जा वाढेल, अशी अपेक्षा आहे.
परीक्षेसाठी आवश्यक सूचना
परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी खालील गोष्टींची काळजी घ्यावी:
1. परीक्षेला येताना पेन, पेन्सिल, स्केल (फुलपट्टी) व शिट्टी सोबत घेऊन येणे.
2. आधार कार्डची झेरॉक्स प्रत (१) व पासपोर्ट साईज फोटो (२) सोबत आणणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
परीक्षेतील सहभाग व संबंधित माहिती मिळवण्यासाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा:
अकिल शेख: ८४२१६६१५१५
जितेंद्र ठाकरे: ९८६०५९१९९९
डॉ. प्रा. भालचंद्र मोरे: ९४०३२५८८५१
अभय सोनार: ७७२००४९१३३
दिलीप सोलंकी: ९७६६४०३४६६
धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी मुजफ्फर अली सय्यद सर यांनी अधिकाधिक इच्छुकांनी या परीक्षेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
परीक्षा दिनांक: १ डिसेंबर २०२४ (रविवार)
परीक्षा वेळ: सकाळी १०:०० वाजता
परीक्षा स्थळ: पिंपळादेवी माध्यमिक विद्यालय, मोहाडी उपनगर, धुळे
कबड्डी पंच बनण्याची सुवर्णसंधी!
या परीक्षेचा फायदा जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे सामील होण्यासाठी होईल. त्यामुळे या परीक्षेला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
– धुळे दर्पण –
![]() |
| - Advertisement - |

