धुळे दर्पण न्यूज :- भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली, तर मतमोजणीची प्रक्रिया २३ नोव्हेंबर २०२४ रोजी यशस्वीरित्या पार पडली. मात्र, धुळे ग्रामीण मतदारसंघातील अवधान मतदान केंद्राविषयी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्यांमुळे संभ्रम निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय महसूल अधिकारी रोहन कुवर यांनी खुलासा करत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

फेक न्यूज पसरवल्याचा प्रकार उघड

धुळे जिल्ह्याच्या महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच जॉईन करा Group 1

  सोशल मीडियावर २५ नोव्हेंबर रोजी सकाळपासून काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांना अवधान मतदान केंद्रावर शून्य मते मिळाल्याचा दावा करणाऱ्या खोट्या व्हिडिओ क्लिप्स आणि संदेश व्हायरल करण्यात आले. या व्हिडिओंच्या माध्यमातून आंदोलन सुरू असल्याचे भासवण्याचा प्रयत्नही झाला. परंतु, प्रशासनाने या बाबींची शहानिशा करून अशा बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे.


अवधान मतदान केंद्रावरील मतदानाची वस्तुस्थिती

Group 2

  अवधान गावात एकूण चार मतदान केंद्रे होती - क्रमांक २४७, २४८, २४९, आणि २५०. या केंद्रांवरील मतमोजणीनुसार काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना एकूण १,०५७ मते मिळाली, तर भाजप उमेदवार राघवेंद्र पाटील यांना १,७४१ मते मिळाली. केंद्रवार आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:

Group 3

Group 4

मतदान केंद्र क्रमांक २४७: काँग्रेस - २२७ मते


मतदान केंद्र क्रमांक २४८: काँग्रेस - २३४ मते


मतदान केंद्र क्रमांक २४९: काँग्रेस - २५२ मते


मतदान केंद्र क्रमांक २५०: काँग्रेस - ३४४ मते



  अवधानमधील एकूण २,८८१ मतांपैकी काँग्रेस उमेदवारांना १,०५७ मते मिळाली, ज्यामुळे "शून्य मते" मिळाल्याचा दावा खोडसाळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.


नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये


  सोशल मीडियावर अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवून नागरिकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी रोहन कुवर यांनी याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशा फेक न्यूज पसरविणाऱ्या व्यक्तींविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


प्रशासनाचे आवाहन


  नागरिकांनी फेक व्हिडिओ व चुकीच्या संदेशांना प्रतिसाद न देणे, तसेच अशा प्रकारच्या खोट्या माहितीचा प्रसार टाळणे आवश्यक आहे. कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे. अफवांचा प्रसार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



– धुळे दर्पण – 

( मुख्यसंपादक: सैय्यद सानिल )

- Advertisement -