धुळे दर्पण न्यूज :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या पातस्खेडे येथून एरंडोल, जळगाव, पारोळा, धुळे व नाशिक या ठिकाणी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पातस्खेडे हे छोटं गाव असून त्याचं राष्ट्रीय महामार्गालगत स्थान असल्यामुळे या गावातून रोज अनेक लोक आपल्या नोकरी, व्यवसाय आणि इतर कामांसाठी शहरात जातात. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे, ज्यांना शालेतील अभ्यासासाठी आणि कॉलेजसाठी प्रवास करावा लागतो.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
तथापि, पातस्खेडे येथे बसस्थानक नसल्यामुळे प्रवाशांना ऐन उन्हाळ्यात व पावसाळ्यात भीषण हाल सहन करावे लागतात. अनेक प्रवासी बससाठी थांबतांना राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडून, झाडाच्या सावलीत थांबून आपली वाट पाहत असतात. उन्हाच्या तासांत या ठिकाणी बसस्थानकाचा प्रचंड अभाव जाणवतो. उघड्यावर थांबलेल्या प्रवाशांना पावसाळ्यात तीव्र पावसाचा सामना करावा लागतो, तर उन्हाळ्यात तप्त उन्हामुळे त्रास होतो.
पातस्खेडे गावाच्या ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी एक से अधिक वेळा प्रशासनाकडे बसस्थानक उभारण्याची मागणी केली आहे. १७ जुलै २०२३, ८ ऑगस्ट २०२३ आणि २० डिसेंबर २०२३ रोजी लेखी निवेदन सादर करून या बाबत गंभीर मागणी केली होती. शेवटी, २१ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालक शिवाली पवार यांनी संबंधित प्रोजेक्ट मॅनेजरला आदेश दिले होते. तथापि, एक वर्ष उलटूनही त्या आदेशावर कोणतीही कृती झाली नाही, आणि पातस्खेडे येथे अजूनही बसस्थानक व नामफलक उभारलेले नाहीत. यामुळे पातस्खेडे येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
धुळे जिल्ह्याच्या महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच जॉईन करा Group 1
सामान्यत: जजू, नानखुर्द आणि वचभालगांव या गावांमध्ये राष्ट्रीय महामार्गापासून लांब असतानाही नामफलक व बसस्थानक तयार करण्यात आले आहेत. परंतु पातस्खेडे हे राष्ट्रीय महामार्गाच्या अत्यंत जवळ असूनही याठिकाणी ती सोय न केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सार्वजनिक सुविधांचा विचार करून लवकरच पातस्खेडे येथे बसस्थानक व नामफलक उभारावे, अशी मागणी पवन देवरे आणि अन्य ग्रामस्थांनी केली आहे. अशाप्रकारे, जर या समस्येवर त्वरित उपाययोजना न केल्यास, प्रवाशांना होणारा त्रास अजूनही सुरू राहील.
– धुळे दर्पण –
