पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष किर्ती गांगुर्डे यांनी समाजवादी पार्टीच्या कार्यालयात पाठिंब्याचे पत्र देऊन हा निर्णय जाहीर केला. या वेळी पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पाठिंब्यामुळे इर्शादभाई जहागिरदार यांचा प्रचार अधिक गतीमान होणार असल्याचे बोलले जात आहे. पक्षाने सायकल या चिन्हावर विश्वास दाखवत धुळेकर जनतेला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
इर्शादभाईंच्या सभांना अभूतपूर्व प्रतिसाद
इर्शादभाई जहागिरदार यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात ट्रक गल्ली, मोगलाई, अभियंता नगर, वाडीभोकर रोड, देवपूर, तसेच हुसेनिया मस्जिद परिसरातील मोठ्या सभांमधून केली. त्यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, सभांच्या ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
प्रचारसभांमध्ये इर्शादभाई म्हणाले, “मी ही निवडणूक वैयक्तिक लाभासाठी लढवत नाही. माझे शिक्षण परदेशात झाले असून ते भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि प्रशासन सशक्त करण्यासाठी वापरणार आहे. धुळे शहराला एका नव्या युगाकडे घेऊन जाण्यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. गेल्या १६ वर्षांपासून मी या शहरातील लोकांची सेवा केली आहे आणि यापुढेही ती सुरू ठेवणार आहे.”
गेल्या १६ वर्षांची सेवा आणि बांधिलकी
इर्शादभाई जहागिरदार यांनी शहरातील गरजूंसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये गरिब विद्यार्थ्यांना वह्या वाटप, गरजू रुग्णांना आर्थिक मदत, तसेच सण-उत्सवांमध्ये अन्नदान व पाणीदान यांचा समावेश आहे. त्यांनी धर्म, जात, पंथ विसरून सामाजिक एकोपा वाढवण्यावर भर दिला आहे.
याशिवाय, शहरात पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी २७० हून अधिक बोअरवेल मोफत खोदून दिल्या आहेत. हे सर्व काम त्यांनी कोणत्याही राजकीय पदावर नसताना स्वतःच्या खिशातून केले आहे. त्यांच्या या कामांची दखल घेत अनेक नागरिक त्यांच्यासोबत उभे राहत आहेत.
विकासाच्या मुद्द्यांवर भर
इर्शादभाई यांच्या प्रचाराची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे रोजगार निर्मिती, शिक्षण क्षेत्राचा विकास, आरोग्य सुविधा सुधारणे, आणि भ्रष्टाचार रोखणे. “आमदार हा केवळ रस्ते, गटार, लाईट यासाठी नसतो, तो संपूर्ण शहराचा कायापालट घडवण्यासाठी असतो,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “धुळे शहराला गेल्या अनेक दशकांपासून विकासापासून दूर ठेवले गेले आहे. जाती-धर्माचे राजकारण बाजूला ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा माझा मानस आहे. मला तुमची साथ हवी आहे, ज्यामुळे आपण या शहराला एका नवीन उंचीवर नेऊ शकतो.”
जनतेला पाठिंब्याचे आवाहन
इर्शादभाई यांनी मतदारांना आवाहन केले की, “माझ्यावर विश्वास ठेवा आणि सायकल चिन्हावर तुमचे मत द्या. तुमच्या मताने विधानभवनात जाऊन मी धुळे शहराचा विकास साध्य करेन.”
सभांना मोठ्या प्रमाणावर उपस्थिती
या प्रचारसभांना नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. सभेत सलीम हाफीज, गुड्डू काकर, अमीन पटेल, महमूद भाईजान, वसीम अक्रम, पप्पू भैय्या मसालेवाले, महेंद्र शिरसाठ, अकील अन्सारी, जमील मन्सुरी, संतोष केदार, राज चौधरी, प्रेम चौधरी, तेजस रणसिंग, राहुल पोळ, निंबा बागुल, भीमराव पाटील, कृष्णा चौधरी आदी उपस्थित होते. महिलांमध्ये जया साळुंखे, वंदना केदार, चंद्रकला शिरसाट, चंद्रकला खैरनार, रंजना निकुंभे, धनश्री साळुंके यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
