धुळे दर्पण न्यूज :-: मुंबईस्थित संदीप फाऊंडेशनच्या संचलनाखाली असलेल्या कमलिनी वाणी हॉस्पिटल शारदा नेत्रालय, धुळे या संस्थेने रुग्णसेवेची यशस्वी २० वर्षे पूर्ण केली आहेत. या वर्धापन दिनानिमित्ताने शारदा नेत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेच्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
पत्रकार परिषदेत संदीप फाउंडेशनचे चेअरमन देवेंद्र शहा, स्थानिक प्रशासन व्यवस्थापक दीपक भाई मेहता, श्रीपाल मुणोत, डॉ. पराग बागड, डॉ. मुबाशीर अन्वर, प्रविण शहा, रमा घोणमोडे, सुदेश बाटुगे, आणि राजेंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
धुळे जिल्ह्याच्या महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच जॉईन करा Group 1
रुग्णसेवेची २० वर्षांची यशस्वी वाटचाल
शारदा नेत्रालयाने २० वर्षांच्या कार्यकाळात ७,३४,००० रुग्णांचे नेत्र तपासणी आणि उपचार केले आहेत. त्यातील १,१५,००० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मोतीबिंदू शस्त्रक्रियेत नवनवीन पद्धती आणल्या आहेत. विशेषतः बिन टाक्यांची व बिना भूल इंजेक्शनची मोतीबिंदू शस्त्रक्रिया येथे नियमितपणे केली जाते.
शैक्षणिक उपक्रम आणि नवीन सेवा केंद्रे
शारदा नेत्रालयाने रुग्णसेवेसोबतच शिक्षण क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. २०१६ पासून पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे, ज्यामुळे नेत्रविज्ञानाच्या क्षेत्रात नवे तज्ञ घडवले जात आहेत. तसेच २०२३ पासून नेर येथे व्हिजन सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही नेत्रचिकित्सेच्या सेवा सहज उपलब्ध होत आहेत.
मोफत शिबिरे आणि सामाजिक उपक्रम
रुग्णालयाच्या वतीने नियमितपणे मोफत नेत्र तपासणी शिबिरे आणि शस्त्रक्रियांचे आयोजन केले जाते. यामधून गरजू रुग्णांना अत्यल्प खर्चात उच्च दर्जाची उपचार सुविधा पुरवली जाते. यामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना देखील लाभ होतो.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
डॉ. जगन्नाथ वाणी यांचे सेवाकार्य पुढे नेण्याचा निर्धार
संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे रुग्णांना किफायतशीर दरात उत्तम सेवा पुरवणे हे आहे. यासाठी संस्थेने डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या सेवाकार्यास पुढे नेण्याचा मानस व्यक्त केला आहे. भविष्यातही नवनवीन उपक्रम राबवून समाजसेवा अधिक व्यापक करण्याचे ध्येय संस्थेने मांडले आहे.
पत्रकारांशी सविस्तर संवाद
पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवरांनी रुग्णालयाच्या कार्यप्रणालीविषयी सविस्तर माहिती दिली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना तांत्रिक आणि व्यवस्थापकीय स्तरावर उत्तरे देण्यात आली.
– धुळे दर्पण –
![]() |
| - Advertisement - |

