धूळ दपर्ण न्युज : आज दुपारी चक्करबर्डी पाइप फॅक्टरीजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. संबंधित व्यक्तीचा मृतदेह रस्त्यालगत बेशुद्धावस्थेत सापडला. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह तात्काळ हिरे मेडिकल कॉलेज येथे नेण्यात आला, परंतु डॉक्टरांनी त्या व्यक्तीस मृत घोषित केले आहे.

घटनेचा तपशील:
  धुळे शहर पोलिस स्टेशनमधील पोकों 1678 शाकीर नसिर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आज दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत पेट्रोलिंग ड्युटी होती. दुपारी 2.05 वाजता धुळे शहर पोलिस स्टेशनकडून फोनद्वारे माहिती देण्यात आली की चक्करबर्डी पाइप फॅक्टरीजवळ एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडलेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोकों शेख यांनी त्यांच्या सोबत पोकों 1053 महेश देवरे आणि चापोकों 1654 संजय रणदिवे यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली.


घटनास्थळी स्थिती:
  चक्करबर्डी पाइप फॅक्टरीजवळ पोहोचल्यावर पोलीस पथकाने एका अनोळखी इसमाला (वय अंदाजे 35 वर्षे) रस्त्यालगत जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. संबंधित व्यक्तीला तातडीने खाजगी अॅम्बुलन्सच्या मदतीने उपचारासाठी हिरे मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले. मात्र, डॉक्टर वसावे यांनी त्या व्यक्तीस तपासून दुपारी 3.40 वाजता मृत घोषित केले.

पुढील तपास सुरू:
  मृत व्यक्तीबाबत कोणतीही ओळख पटलेली नाही. त्याचा मृतदेह हिरे मेडिकल कॉलेजच्या शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आला आहे. धुळे शहर पोलीस पुढील तपास करीत असून मृत व्यक्तीच्या ओळखीबाबत माहिती मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.


पोलीस जनतेस आवाहन:
  धुळे शहर पोलीसांनी जनतेस आवाहन केले आहे की, जर या मृत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित धुळे शहर पोलिसांशी संपर्क साधावा. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून सतर्कतेने तपास सुरू आहे.

– धुळे दर्पण – 

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम