धुळे दर्पण न्यूज :-  ए.के.आय.च्या पूना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, कॅम्प, पुणे येथील कॉलेज परीक्षा अधिकारी (CEO) आणि संशोधन मार्गदर्शक डॉ. सैय्यद वकील अहमद मुनाफ अली यांचा गौरव वरिष्ठ चार्टर्ड अकाउंटंट सीए. के.यू. नाबरिया सर यांच्या हस्ते करण्यात आला. हा सन्मान समारंभ धुळे दर्पण या प्रसिद्ध डिजिटल माध्यम मंचाच्या वतीने डॉ . सय्यद वकील यांच्या निवास्थानी हा कार्यक्रमाच्या आयोजित करण्यात आला होता.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  धुळे दर्पणने डॉ. सैय्यद वकील यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी, विशेषतः उर्दू माध्यमातून कॉमर्स शाखेतील संशोधन मार्गदर्शक म्हणून धुळे जिल्ह्यातील पहिल्या व्यक्ती होण्याच्या ऐतिहासिक यशाबद्दल गौरविले. त्यांच्या या योगदानामुळे शैक्षणिक क्षेत्रात नवा मानदंड प्रस्थापित झाला आहे.

वरिष्ठ चार्टर्ड अकाउंटंट सीए. के.यू. नाबरिया सर यांच्या हस्ते करण्यात आला

  डॉ. सैय्यद वकील यांनी मार्च २०२२ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (कॉमर्स) विषयात पीएच.डी. पूर्ण केली. त्यांचे मार्गदर्शन प्राचार्य प्रो. (डॉ.) आफताब अन्वर शेख यांनी केले.


  गौरव समारंभास विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यात प्रमुख पाहुणे म्हणून धुळे दर्पणचे मुख्य संपादक सैय्यद सानिल, सहसंपादक मुबश्शीर, इकरा खान्देश फॉउंडेशनचे खजिनदार बद्रुद्दीन शेख, आरएसएम मल्टिसर्व्हिसेसचे सैय्यद राहील, तसेच अक्रम सैय्यद यांचा समावेश होता.


  डॉ. सैय्यद वकील यांचे वडील श्री. सैय्यद मुनाफअली आणि आई श्रीमती शमीम बानो हे देखील या समारंभात उपस्थित होते. आपल्या मुलाच्या या यशाबद्दल त्यांनी कौतुकाचा अभिमान व्यक्त केला.


  डॉ. सैय्यद वकील यांनी आपले प्राथमिक शिक्षण स्वेस उर्दू स्कूल, धुळे येथून पूर्ण केले आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या सन्मानाने डॉ. सैय्यद वकील यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेण्यात आली असून त्यांनी केलेल्या कामामुळे शिक्षण क्षेत्रातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल. कॉमर्स क्षेत्रातील संशोधन व शिक्षणाला प्रेरणा देणारे नेतृत्व म्हणून त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम