दोंडाईचा प्रतिनिधी:- रईस शेख 

धुळे दर्पण न्यूज :- धावडे (ता. शिंदखेडा) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जगदीश पाटील यांची धनगर समाज संघर्ष समितीच्या धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेत त्यांना एकमताने या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.


  धनगर समाज संघर्ष समितीचे अनेक वर्षांपासून पाटील यांनी निःस्वार्थपणे काम केले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल समितीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली. अजंग वडेल येथे धनगर समाज संघर्ष समितीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक व माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या उपस्थितीत जगदीश पाटील यांना धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या सोहळ्यात धनगर समाज संघर्ष समितीचे महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर परदेशी, महाराष्ट्र उपाध्यक्ष पंडित अण्णा मदणे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष विठ्ठल मारनर, राज्य प्रसिद्ध प्रमुख सुनिल धनगर, धुळे जिल्हाध्यक्ष रमेश सरग, भाजपा उद्योग आघाडीचे लखन रुपनर, सोनगीर उपसरपंच लखन ब्रुगले, ओबीसी नेते भटू चौधरी, नितीन शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

  कार्यक्रमात धुळे जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून राजेंद्र नानाभाऊ मारनर यांचीही निवड करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे समाजाच्या विकासासाठी नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


प्रतिक्रिया आणि अभिनंदनाचा वर्षाव

   जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राज्य पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल, अ‍ॅड. ज्ञानेश्वर पाटील, माजी नगरसेवक जितेंद्र गिरासे, नरेंद्र कोळी, दिनेश जयसिंघानी, छोटू मराठे, चुडामण भाऊसाहेब, बंटी पहलवान, गजेंद्र कानडे, अतुल पदमोद, महेश धनगर यांसह अनेकांनी पाटील यांचे अभिनंदन केले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

   याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना जगदीश पाटील म्हणाले, “सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत असताना समाजाने मला ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीन. समाजातील गोरगरीब आणि दीनदुबळ्या नागरिकांच्या न्याय हक्कासाठी झगडण्यास मी कटिबद्ध आहे. भविष्यात समाजासाठी अधिक प्रभावीपणे काम कसे करता येईल, यासाठीही नियोजन करणार आहे.”


पाटील यांच्या निवडीमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील कार्याची उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम