धुळे दर्पण न्यूज :- दोंडाईचा, 26 जानेवारी – येथील जनजागृत शिक्षण प्रसारक शिक्षण संस्था संचलित एम.आर.एम. ज्युनियर कॉलेज, वि.जा. भ.ज. प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, दोंडाईचा येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी संजय विश्राम पाटील यांनी उपस्थिती लावली व त्यांच्याच शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दोंडाईचा नगरपालिकेचे नगरसेवक तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब हितेंद्र महाले यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.एन. पाटील, नगरसेविका सौ. भावना महाले, संस्थेचे माजी खजिनदार हेमंत महाले, सौ. नंदाताई महाले, जिल्हा सचिव (मनविसे, धुळे) निलेश महाले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन
ध्वजारोहणानंतर संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व, भारतीय संविधानाचा इतिहास आणि आजच्या युगात विद्यार्थ्यांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, खेळ, स्पर्धा परीक्षा, आरोग्य, कसरत आणि अन्य कौशल्यांमध्ये उत्कृष्टता मिळवून आपला सार्वांगीण विकास करण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत शिक्षकांचेही विशेष कौतुक केले. त्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच क्रिडा क्षेत्रात उत्तम प्रदर्शन करण्यास प्रेरित केले.
संस्थेचे अध्यक्ष हितेंद्र महाले यांनी संस्थेच्या वाटचालीविषयी माहिती दिली. त्यांनी शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी यावर भर देत विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षणासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पुरस्कार वितरण
या सोहळ्यात शालेय क्रिडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विविध खेळ, शैक्षणिक स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नीळकंठ कुलकर्णी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जितेंद्र गिरासे सर यांनी केले.
![]() |
| - Advertisement - |
या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण आश्रमशाळा देशभक्तीमय वातावरणाने भारावली होती. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे देशप्रेम व्यक्त केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, भविष्यातही शिक्षण आणि विविध क्षेत्रात यश संपादन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

