धुळे दर्पण न्यूज :- केंद्रीय भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांच्यासोबत खा. डॉ. शोभा बच्छाव यांनी महत्त्वपूर्ण चर्चा करत मोहाडी रेल्वे स्थानक नुतनीकरणासाठी आर्थिक मंजुरी मिळवली आहे. या बैठकीत धुळे जिल्ह्यातील रेल्वे समस्या, विकास प्रकल्प आणि स्थानिक गरजांवर सविस्तर विचारमंथन झाले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
धुळे क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प:
बोरविहीर-धुळे-नरडाणा रेल्वे मार्ग, मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे लाईन, आणि धुळे रेल्वे स्थानकाच्या प्रगतीसाठी सकारात्मक पावले उचलण्यावर बैठकीत चर्चा झाली. धुळे-पुणे-धुळे ही रेल्वे सेवा, जी कोरोनाच्या काळात बंद झाली होती, ती पुन्हा सुरू करण्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, मालेगाव येथे प्रस्तावित रेल्वे स्थानक व मालधक्का यासाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
मोहाडी स्थानक नुतनीकरणासाठी काय सुधारणा होणार?
मोहाडी रेल्वे स्थानकाची सद्यःस्थिती अत्यंत वाईट असल्याचे निदर्शनास आले होते. या ठिकाणी स्वच्छतागृहे, तिकीट बुकिंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्लॅटफॉर्मची डागडुजी, रस्त्यांचे नूतनीकरण, पंखे आणि लाईट्स या सुविधा उभारण्यात येणार आहेत. तसेच, स्थानकासाठी नव्या प्लॅटफॉर्मचे बांधकाम आणि वैद्यकीय सोयी उपलब्ध करून देण्याचीही योजना आखण्यात आली आहे.
![]() |
| - Advertisement - |
बोरविहीर-धुळे-नरडाणा रेल्वे मार्गातील सोनगीर, दापोरी, बाळापूर आणि इतर गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या संपादनासंदर्भात निर्माण झालेला विरोधही चर्चेचा भाग ठरला. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन केंद्र शासनाकडे मांडण्याचे आश्वासन खा. बच्छाव यांनी दिले.
कापड व शेती उद्योगांना मिळणारे फायदे:
धुळे परिसरातील कापूस, डाळिंब, गहू, तांदूळ आणि सिमेंट यांसारख्या उत्पादनांसाठी गोदामे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेती व उद्योग क्षेत्राला चालना मिळेल.
अध्यक्षांचे आभार:
खा. डॉ. शोभा बच्छाव यांनी या निर्णयासाठी केंद्र सरकार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, आणि सतीश कुमार यांचे आभार मानले आहेत.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
धुळे लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी ठोस प्रयत्न:
मोहाडी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणास मंजुरी मिळाल्याने धुळे लोकसभा क्षेत्रातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या प्रकल्पांमुळे रेल्वे सेवा अधिक सुटसुटीत होईल आणि परिसराचा विकास वेगाने होईल, असा विश्वास खा. डॉ. शोभा बच्छाव यांनी व्यक्त केला आहे.
--- सैय्यद सानिल, धुळे दर्पण
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


