धुळे दर्पण न्यूज :- फागणे (ता. धुळे) भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा ग्रामीणच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन आज सोमवार, १३ जानेवारी २०२५ रोजी फागणे गावात करण्यात आले. या अभियानाला ग्रामस्थ, तरुण, व्यावसायिक आणि इतर नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी ग्रामस्थांना पक्षाच्या विचारधारेशी जोडून भाजपाचा भाग बनण्याचे आवाहन करण्यात आले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  कार्यक्रमाला धुळे ग्रामीण विधानसभेचे आमदार मा. श्री. रामदादा भदाणे, भाजपा धुळे जिल्हा महामंत्री व सदस्य नोंदणी जिल्हा संयोजक किशोर सिंगवी, भाजपा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव सर, फागणे सरपंच प्रतिनिधी भुरुआबा पाटील, माजी उपसरपंच खेमेश भैय्या, विकास सोसायटीचे चेअरमन धनराज आनंदा पाटील, तसेच भालुआबा पाटील, काशीनाथ नाना पाटील, सोनू भदाणे, देविदास पाटील, भगवान भटू पाटील, बबलू पाटील, गोलू पाटील, निखील सिंगवी आदी मान्यवर उपस्थित होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  कार्यक्रमादरम्यान, उपस्थित नेत्यांनी भाजपा सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली व या योजना ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी कशा उपयुक्त ठरल्या आहेत, यावर चर्चा केली. तसेच ग्रामस्थांना भाजपाचे सदस्य होण्याचे महत्त्व पटवून दिले.


  सदस्य नोंदणी अभियानाचे नेतृत्व करताना आमदार रामदादा भदाणे यांनी सांगितले की, “भाजपाने नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे, आणि यासाठी प्रत्येकाने भाजपाशी जोडले जाणे गरजेचे आहे.”


  या उपक्रमादरम्यान, ग्रामस्थांना तात्काळ सदस्यत्व घेण्याची संधी देण्यात आली. यावेळी गावातील तरुणांनी उत्साहाने भाजपाचे सदस्यत्व घेतले आणि पक्षाच्या विचारधारेशी जोडले गेल्याचा अभिमान व्यक्त केला.

- Advertisement -
   कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून गावात आणि परिसरात भाजपाच्या सदस्य नोंदणी मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. यामुळे भाजपाचे स्थान ग्रामीण भागात अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असे मत कार्यक्रमाचे संयोजक किशोर सिंगवी यांनी व्यक्त केले.

---सैय्यद सानिल (धुळे दर्पण)

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -