धुळे दर्पण न्यूज :- शहरातील विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपव्यय होत असल्याचे सातत्याने उघड होत आहे. धुळे शहरातील देवपूर भागात ‘अमृत एक’ योजनेअंतर्गत राबविण्यात आलेली मलनिस्सारण योजना पूर्णतः फेल गेली असून, या योजनेतील पाईपलाईन बेकायदेशीर पद्धतीने पांझरा नदीच्या पात्रात सोडण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हीच पाईपलाईन नंतर चौपाटी रस्त्यावर आणली जात असून, अवघ्या चार महिन्यांपूर्वीच दोन कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याची पुन्हा खोदकाम सुरू आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
![]() |
| महानगरपालिकेचा हलगर्जी कारभार उघड शिवसेनेचा प्रशासनाविरोधात जोरदार आक्रोश |
महानगरपालिकेचा अजब कारभार!
धुळे महानगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे शहरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकतेच तयार करण्यात आलेले रस्ते पुन्हा पुन्हा खोदण्याची परंपरा मनपाने सुरूच ठेवली आहे. देवपूरमधील काझवे पुल ते सिद्धेश्वर हॉस्पिटल या मार्गावरील मलनिस्सारण योजनेची पाईपलाईन चुकीच्या पद्धतीने टाकल्याने ती परत वर आणण्याचे काम सुरू आहे. यामुळे नुकतेच तयार झालेल्या रस्त्याची पुन्हा वाताहत झाली आहे.
गुजरातच्या ठेकेदाराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह!
या संपूर्ण कामात मनपाच्या अधिकाऱ्यांची व ठेकेदारांची मनमानी दिसून येत आहे. या कामासाठी नियुक्त करण्यात आलेला गुजरातमधील ठेकेदार खरोखरच स्थापत्य अभियंता आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे. या ठेकेदाराने केलेल्या कामांची गुणवत्ता आधीच संशयास्पद ठरली आहे.
![]() |
| - Advertisement - |
धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी नदीच्या दोन्ही बाजूंना रस्ते जोडण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, जयहिंद जलतरण तलावाच्या अतिक्रमणामुळे काझवे पुलाशी हा रस्ता जोडता आला नाही. विशेष म्हणजे, जलतरण तलाव बेकायदेशीर असल्याने तो पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तरीसुद्धा मनपा प्रशासन या आदेशाकडे दुर्लक्ष करून तलावाला अभय देत आहे.
शिवसेनेचे आंदोलन आणि चौकशीची मागणी
या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाला असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात शिवसेनेच्या वतीने महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली चौपाटी रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेने राज्याच्या गृहसचिवांना या अपप्रकाराची संपूर्ण माहिती मेलद्वारे पाठवली असून, तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी आंदोलनात भरत मोरे, शिवाजी शिरसाळे, हिमांशू परदेशी, मनोज शिंदे, निलेश कांजरेकर, अमोल ठाकूर, अनिल शिरसाट, वैभव पाटील, केतन भामरे, विष्णू जावडेकर, गोकुळ बडगुजर, हंसराज पाटील, गुलाब धोबी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
धुळेकरांचा संताप – जबाबदार कोण?
महानगरपालिकेच्या हलगर्जी कारभारामुळे धुळेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम पूर्ण होऊन चार महिनेही झाले नाहीत, तोच परत खोदकाम सुरू आहे. शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्याच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
आता यावर प्रशासन काय पावले उचलते, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होते का, आणि रस्त्यांचे भविष्य काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



