धुळे दर्पण न्यूज :-
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा महाराष्ट्रभर दि. 7 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. ही ऐतिहासिक यात्रा त्यागमूर्ती रमाई स्मारक, वरळी, चैत्यभूमी, दादर येथून निघणार आहे. 23 फेब्रुवारी 2025 रोजी या यात्रेचा भव्य समारोप धुळे बसस्थानक शेजारील संदेशभूमी येथे होणार आहे.


  ही यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचा महत्त्वपूर्ण संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. चैत्यभूमीतून निघाल्यानंतर ही यात्रा ठाणे, शहापूर, नाशिक, चांदवड, मालेगाव, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर, धरणगाव, चोपडा, शिरपूर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, शहादा, प्रकाशा, तळोदा, नंदुरबार, खांडबारा, नवापूर, साक्री मार्गे प्रवास करत धुळ्यात पोहोचणार आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

धुळ्याच्या ऐतिहासिक संदेशभूमीवर समारोप

  धुळे जिल्ह्यातील संदेशभूमी ही एक ऐतिहासिक स्थळ आहे, जिथे बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः पाय ठेवले होते. 31 जुलै 1937 आणि 17-19 जून 1938 या कालावधीत बाबासाहेब न्यायालयीन कामासाठी वाघाडी, ता. शिरपूर येथे आले होते. त्या वेळी धुळ्यातील जनतेने त्यांचे भव्य स्वागत करून मिरवणूक काढली होती. बाबासाहेब धुळे रेल्वे स्टेशनहून ट्रॅव्हल्स बंगलो (सध्याची संदेशभूमी) येथे आले होते, याची नोंद त्यांच्याच शेरेबुकात आहे.


  ही ऐतिहासिक घटना लक्षात ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा 23 फेब्रुवारी रोजी संदेशभूमी, धुळे येथे पोहोचेल आणि समारोप कार्यक्रम होईल.

- Advertisement -
कार्यक्रमाचे खास आकर्षण – अभिनेते गगन मालिक यांची उपस्थिती

  या ऐतिहासिक यात्रेच्या समारोप कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून गगन मलिक फाउंडेशनचे अभिनेते गगन मालिक, श्री. भीमराव आंबेडकर, श्री. दादा मलिक यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

2037 पर्यंत पाच टप्प्यात यात्रा

  ही अस्थिकलश संदेश यात्रा 2037 पर्यंत पाच टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. यामागील उद्देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणे, समाजात सामाजिक समता प्रस्थापित करणे आणि नव्या पिढीपर्यंत त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा वारसा पोहोचवणे हा आहे.


सर्व समाजबांधवांना आवाहन

  बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक अस्थिकलश यात्रेत सहभाग घेऊन दर्शन घ्यावे आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आयोजकांना सहकार्य करावे, असे आवाहन संदेशभूमी प्रमुख आनंद सैदाने, विजय भांमरे, विजय मोरे आणि संयोजन समिती सदस्यांनी केले आहे.


- सैय्यद सानिल

"धुळे दर्पण"

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम