धुळे दर्पण न्यूज :- श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजीच्या गगनभेदी घोषणांनी आज धुळ्यात "जय शिवाजी, जय भारत" पदयात्रा जल्लोषात संपन्न झाली. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गरुड मैदान, धुळे येथे या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या पदयात्रेस खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात करण्याचे आवाहन
पदयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव म्हणाल्या, "छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा आयोजित केली आहे. सर्वांनी शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावेत."
आमदार अनुपभैय्या अग्रवाल म्हणाले, "सर्व नागरिकांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी. केंद्र व राज्य शासनाने आयोजित केलेल्या ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मी आभार मानतो."
![]() |
| - Advertisement - |
पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, तहसीलदार अरुण शेवाळे, जिल्हा सैनिक अधिकारी डॉ. मेजर निलेश पाटील, क्रीडा अधिकारी एम. के. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
विविध कार्यक्रमांचे आयोजन
धुळे युथ क्लब आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा अभियानांतर्गत’ किल्लेदार स्पर्धा आणि मातीच्या किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच ‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपणही करण्यात आले.
पदयात्रेचा मार्ग
गरुड मैदान येथून सुरू झालेली ही पदयात्रा क्युमाईन क्लब, जेल रोड, तहसील कार्यालय, राजवाडे बैंक, झाशी राणी पुतळा मार्गे जुनी महानगरपालिका, पारोळा रोड, प्रकाश टॉकीज जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. या पदयात्रेत विविध शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



