धुळे दर्पण न्यूज :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरच्या मारुती मराठा पंचमंडळ व धुळे जिल्हा सकल मराठा समाज संचलित शिवजयंती उत्सव समितीतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर रामभाऊ दाढीवाला खुंट, गली नंबर ५ येथे पार पडले. या उपक्रमाच्या माध्यमातून तब्बल १०० हून अधिक रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या रक्तदान शिबिराचे आयोजन भावेश फरताडे, संजय फरताडे, चेतन मराठे, शुभम चव्हाण, गौरव पवार, बाळू मोहिते, प्रणय शिंदे, यश शिंपी, कृष्णा आवळकंठे, ओम लुटे, समर्थ वाघारे यांनी केले होते. समाजाच्या विविध स्तरातून लोकांनी या शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये उमेश निंबा मराठे, बाळू रावळे, भावेश फरताडे, चेतन मराठे, मोहित वाघ, शुभम चव्हाण, प्रणय चव्हाण, विराज परभणे, हर्षराज साळुंखे, संदेश साळुंखे, गौरव पवार, प्रणय शिंदे, रुद्र जिरेकर आदींचा समावेश होता. त्यांनी या उपक्रमासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या शिबिरात जवळपास १०० जणांनी रक्तदान करून समाजकार्याला हातभार लावला.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
रक्तदान ही मानवतेची खरी सेवा असून, या रक्तदान शिबिरातून अनेक गरजू रुग्णांना मदत मिळणार आहे. या उपक्रमामुळे समाजात एक सकारात्मक संदेश पोहोचला आहे. आयोजकांनी भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.
शिवजयंतीच्या पवित्र पर्वावर आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामुळे समाजात एकता, बंधुता आणि सेवा भावनेचा जागर झाला असून, भविष्यातही मराठा समाज अशाच विधायक कार्यासाठी पुढाकार घेईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |

