धुळे दर्पण न्यूज :- विद्यावर्धिनी सभेचे डॉ. एम. वाय. वैद्य कला, प्रा. पी. डी. दलाल वाणिज्य आणि डॉ. डी. एस. शहा विज्ञान महाविद्यालय तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. १८) सकाळी ९ वाजता महाविद्यालयात महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात बेरोजगार युवक-युवतींसाठी नोकरी आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत कौशल्यविकासाची संधी उपलब्ध होणार आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. जगदीश पाटील, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त राजू वाकोडे, उपप्राचार्य राजेंद्र गावीत, प्लेसमेंट विभागाचे प्रा. रोठे, प्रा. डॉ. देवेंद्र विसपुते, प्रा. संतोष खत्री यांनी पत्रकार परिषदेत मेळाव्याची माहिती दिली.


नामांकित कंपन्यांचा सहभाग

  या महारोजगार मेळाव्यात २० ते २२ नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, विविध पदांवर बेरोजगारांची निवड केली जाणार आहे. या कंपन्यांमध्ये नाशिक, जळगाव आणि धुळे या ठिकाणांतील उद्योगसमूहांचा समावेश आहे. कंपन्यांकडे रिक्त असलेल्या विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

नोकरी आणि प्रशिक्षणासाठी संधी

  या मेळाव्यात विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. यात –

    १०वी, १२वी उत्तीर्ण

    आयटीआय आणि ट्रेनी पदे

    बी.एस्सी, बी.कॉम, एम.ए., एम.कॉम, एम.एम.सी.

    फार्मसी, डिप्लोमा, एम.फार्मसी

    माहिती तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या १७ शाखांतील पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवार

या सर्व गटातील उमेदवारांसाठी विविध पदे उपलब्ध असणार आहेत.


मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत निवड

  विशेष म्हणजे, या रोजगार मेळाव्यातून २०% उमेदवारांची निवड मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसाठी केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या युवकांना कौशल्य प्रशिक्षण, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक मार्गदर्शन आणि पुढील करिअरसाठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

- Advertisement -

प्राचार्यांचे आवाहन – "कौशल्य विकास अनिवार्य"

  याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा. जगदीश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “फक्त पदवी घेऊन उपयोग नाही, प्रत्येकाने काही ना काही कौशल्य विकसित केले पाहिजे. कौशल्य आणि प्रशिक्षण हेच यशस्वी करिअरची गुरुकिल्ली आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन युवकांनी आपली संधी साधावी.”


नाव नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे

  युवकांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड), बायोडाटा आणि पासपोर्ट साइज फोटो घेऊन उपस्थित राहावे.


– प्रतिनिधी, धुळे दर्पण

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -